सुरेशदादांसह आजी-माजी नगरसेवकांवर अटकेची टांगती तलवारवाघूर, विमानतळ, जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी कोर्टात कामकाज, १९ जुलैला कामकाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |

 
सुरेशदादांसह आजी-माजी नगरसेवकांवर अटकेची टांगती तलवार
वाघूर, विमानतळ, जिल्हा बँक घोटाळाप्रकरणी कोर्टात कामकाज, १९ जुलैला कामकाज

जळगाव, २८ जून
महापालिकेतील वाघूर, विमानतळ घोटाळाप्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन, आजी-माजी नगरसेवक व अधिकार्‍यांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. याप्रकरणी गुरुवारी औरंगाबाद खंडपीठात कामकाज झाले. यावेळी पोलिसांनी अद्याप कारवाई का केली नाही? अशी विचारणा करीत १९ जुलैला युक्तीवाद करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना न्यायालयाने दिले.
 
सुरेशदादांवर जिल्हा बँकेतील कथित अनियमिततेचाही आरोप आहे.
मनपा नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी सन २०१२ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, तत्कालीन आमदार सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व आजी-माजी महापौर, नगरसेवक तसेच अधिकारी यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात मनपाच्या योजनांमधील भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसेच जिल्हा बँक अपहारप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.
 
परंतु घरकुल वगळता इतर कोणत्याच गुन्ह्याखाली पोलिसांनी करवाई केली नसल्याने नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात ऍड. एस.पी. ब्रह्मे यांच्यामार्फत याचिका (क्र. ६०३/१५) दाखल केली होती. याप्रकरणी गुरुवारी खंडपीठात न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्या. जाधव यांच्यासमोर युक्तीवाद झाला. सरकारी वकील  एड.नामदे यांनी सांगितले की, या प्रकरणी सर्व तपास पूर्ण झाला आहे मात्र, फिर्यादी त्रयस्त व्यक्ती असल्याने काळे ऍण्ड सन्स यांच्यामार्फत गैरव्यवहाराच्या रकमेची पडताळणी करून लेखापरीक्षण व पुढील कार्यवाही करणे बाकी आहे. न्यायालयाने १९ जुलैला अंतिम अहवाल सादर करीत युक्तिवाद करण्याचे आदेश दिले.
 
@@AUTHORINFO_V1@@