सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडियो व्हायरल, विरोधकांना सणसणीत चपराक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |


 
 
नवी दिल्ली :  दोन वर्षांआधी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सीमेपार जाऊन सर्जिकल स्ट्राइक केली, त्या ऐतिहासिक कारवाईचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. यामुळे जे विरोधक सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करत होते, त्यांना सणसणीत चपराक बसली आहे. या सर्जिकल स्ट्राइकमध्ये भारतीय लष्करानं रॉकेट लाँचर, मिसाइल आणि छोट्या शस्त्रास्त्रांनी हल्ला चढवला होता.
 
 
 
 
दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमधल्या भारतीय लष्कराच्या तळावर केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल हे सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले होते. पाकिस्तानने १८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथे हल्ला केला, त्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कराने २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी म्हणजेच ऊरी हल्ल्याच्या केवळ ११ दिवसांनंतरच हे सर्जिकल स्ट्राइक केले.
 
२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सीमेत तीन किलोमीटर आतपर्यंत घुसून सर्जिकल स्ट्राइक केले. त्याच दरम्यान भारतीय लष्करानं पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या कॅम्पना नेस्तनाबूत केले होते. रात्री दोन वाजल्यापासून ते पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत म्हणजे तीन ते चार तास हल्ला सुरू होता. या हल्ल्यात लष्कराला जीवित हानी झाली नाही.
 
या सर्जिकल स्ट्राईकवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र हा व्हिडियो व्हायरल झाल्यामुळे आता या विरोधकांना सणसणीत चपराक बसली आहे.
@@AUTHORINFO_V1@@