तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केली तर मग व्हिडियो का नाही प्रसिद्ध केला? : सुब्रमण्यम स्वामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली :  सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडियो प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर ताशेरे ओढायला सुरुवात केली. त्याला प्रत्यूत्तर देत सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसला सुनावले आहे. "तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केली, तर त्याचा व्हिडियो का प्रसिद्ध केला नाहीत? आणि तुम्ही केला नाहीत म्हणून आम्ही पण करु नये असे का? असा प्रश्न स्वामी यांनी उपस्थित केला आहे. तसेच "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" अशी परिस्थिती आता काँग्रेसची झाली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
 
 

 
 
 
सर्जिकल स्ट्राईकचा व्हिडियो प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसने यावर टीका करत, याला भारतीय जनता पक्षाची मतं मिळवण्याची एक खेळी असल्याचे सांगितले. "जवानांच्या नावावर आणि असे व्हिडियो प्रसिद्ध करत तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळत आहात. हे केवळ मतं मिळवण्यासाठी उभं केलेलं एक षडयंत्र आहे." अशा शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर टीका केली. आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
दोन वर्षांआधी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सीमेपार जाऊन सर्जिकल स्ट्राइक केली, त्या ऐतिहासिक कारवाईचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. यामुळे जे विरोधक सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करत होते, त्यांना सणसणीत चपराक बसली आहे. या सर्जिकल स्ट्राइकमध्ये भारतीय लष्करानं रॉकेट लाँचर, मिसाइल आणि छोट्या शस्त्रास्त्रांनी हल्ला चढवला होता.
 
२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सीमेत तीन किलोमीटर आतपर्यंत घुसून सर्जिकल स्ट्राइक केले. त्याच दरम्यान भारतीय लष्करानं पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या कॅम्पना नेस्तनाबूत केले होते. रात्री दोन वाजल्यापासून ते पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत म्हणजे तीन ते चार तास हल्ला सुरू होता. या हल्ल्यात लष्कराला जीवित हानी झाली नाही.
@@AUTHORINFO_V1@@