शिर्डी संस्थानासाठी राज्य सरकारचे जमीन खरेदी धोरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |




१५ किलोमीटरच्या बाहेरील जमिनी खरेदी करण्यास मनाई


मुंबई : राज्य सरकारने शिर्डी संस्थानाकडून खरेदी करण्यात येणार्या जमिनींसाठी नवे धोरण तयार केले आहे. बागायती जमिनीच्या खरेदीदरम्यान एक एकरपेक्षा कमी जमीन खरेदी करू नये, शिर्डीपासून १५ किमीपेक्षा अधिक लांबची जमीन खरेदी करू नये, तसेच संस्थानाच्या जवळ असलेल्या जमिनींच्या खरेदीला प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना नव्या धोरणात करण्यात आल्या.

शिर्डी संस्थान हे त्यांच्या विविध लोकोपयोगी तसेच संस्थानच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या प्रयोजनासाठी जमिनी खरेदी करण्यास प्राधान्य देत असते. संस्थानाच्या कामासाठी खासगी लोकांकडूनदेखील जमिनी खरेदी केली जाते. यापूर्वी या जमीन खरेदी व्यवहारासाठी कोणत्याही प्रकारचे नियम नव्हते. मात्र, आता जमीन खरेदीसंदर्भात नवे धोरण जाहीर करण्यात आले आहे. यामुळे यापुढे शिर्डी संस्थानाला शासनाच्या नव्या धोरणाप्रमाणेच जमिनींची खरेदी करावी लागणार आहे.खासगी व्यक्तीची बागायती जमीन खरेदी करायची असल्यास ती जमीन एक एकरापेक्षा कमी असू नये, असे धोरणात स्पष्ट केले आहे. तसेच जिरायती जमीन खरेदी करायची असेल तर किमान दोन एकर जिरायती जमीन खरेदी करावी, असे या नवीन धोरणात स्पष्ट केले आहे. तसेच सध्या संस्थानाच्या जमिनीला लागून जर जमीन असेल आणि ती जमीन संस्थानाच्या विकासासाठी महत्त्वाची असेल तर अशी सलग असणारी जमीन खरेदी करता येईल, असेही या धोरणात म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@