आयआयटी पदवीधरांनी तंत्रज्ञानातून देशवासियांचे जीवनमान उंचवावे : राष्ट्रपती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |

 
 
कानपूर : भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात आयआयटी पदवीधरांनीं तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशवासियांचे जीवनमान उंचवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडावी असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. आयआयटी कानपूरच्या ५१व्या दीक्षांत समारंभातील आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक व राज्याचे औद्योगिक विकास मंत्री सतीश महाना उपस्थित होते.
 
 
 
शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते असे कोविंद यावेळी म्हणाले. मोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी प्रेरित व्हा, मोठा विचार करा, अपयशाला घाबरू नका आणि जीवनात शिस्त आणा हे चार मंत्र यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिले व त्याचे पालन करण्याचे आवाहन केले. तंत्रज्ञांनी आपले ज्ञान व कौशल्य देशाच्या आणि मानवतेच्या कल्याणासाठी उपयोगात आणावे असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
 
 
 
 
'मँचेस्टर ऑफ ईस्ट' म्हणून पूर्वीच्या काळी कानपूरची ओळख होती. त्यामुळे पुन्हा एकदा कानपूरच्या विकासासाठी व औद्योगिक विकासासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार, नागरिक, उद्योग जगत आणि शिक्षण संस्था या सर्वांनी मिळून कानपूरच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज राष्ट्रपतींनी यावेळी प्रतिपादित केली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@