जळगाव मनपा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |
 
 
जळगाव, २८ जून :
जळगाव महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होवून प्रक्रिया सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्तात्रय कुराळे यांनी गुरूवारी पत्रपरिषदेत दिली.
 
 
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे आणि शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी गेल्या १० वर्षातील गुन्हेगारांचा ‘डाटा’ तयार केला आहे. यात सुमारे १३ हजार गुन्हेगारांची माहिती संकलित झाली आहे. एमपीडीएचे ३ प्रस्ताव पोलीस प्रशासनाने पाठवले आहेत. अजून १ - २ प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला जाणार आहे. निवडणुकीत कोणताही गोंधळ व्हायला नको म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे. हद्दपारीचे ४५ प्रस्ताव पाठविले असून त्याचा पाठपुरावा केला जात आहे. तसेच काहींना हद्दीतून बाहेर काढण्याची आदेश प्रक्रिया सुरु झाली आहे.
 
 
टोळ्यांवर सुध्दा लक्षकेंद्रित
भुसावळ, अमळनेर आणि जळगाव शहरातील प्रत्येकी एक टोळी हद्दपार करण्याचा प्रस्ताव असून त्याचीही आदेश प्रक्रिया सुरु असल्याचे कराळे यांनी सांगितले. महानगरपालिका निवडणूक चुरशीची होणार असून त्यात कोणताही गोंधळ नको आणि जोखीम नको म्हणून पोलीस प्रशासनाने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कंबर कसली असल्याचे दिसून आले.
@@AUTHORINFO_V1@@