'विरोधकांना देशापेक्षा कुटुंबाची अधिक चिंता' : पंतप्रधान मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |

मघर (उ.प्र.) : देशातील विरोधकांना आज देशात होत असलेला विकास नको आहे, देशातील जनता शांततेत आणि गुण्यागोविंदाने नांदत असलेली त्यांना पाहवत नाही, त्यामुळे फक्त सत्तेसाठी म्हणून ते देशात अराजकता पसरवू पाहत आहेत, कारण त्यांना देशापेक्षा अधिक स्वतःच्या कुटुंबाची अधिक चिंता आहे' अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. संत कबीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर प्रदेशमधील मघर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये आज ते बोलत होते.

'संत कबीरांनी समाजाला शांततेचा आणि एकात्मतेच संदेश दिला होता. सर्व समाजाने आनंदाने एकत्रित राहावे, असे म्हणत होते. परंतु आज देतीलत विरोधक सत्तेसाठी किती आतुर झाले आहेत. हे सामान्य जनता अगदी जवळून पाहत आहे. आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून आज देशातील विरोध देशातील एकता भंग करू पाहत आहे. गेल्या ४३ वर्षांपूर्वी आणीबाणी विरोधात जे लोक एकत्र उभे राहिले होते. आज तेच लोक आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी म्हणून देशावर आणीबाणी लादणाऱ्यांच्या बाजुने जाऊन उभे राहिले आहे, त्यामुळे समजवाद आणि बहुजनवादाच्या गप्पा मारणाऱ्यांचा खरा चेहरा जनते समोर आला आहे' असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. दरम्यान सरकारने गेल्या चार वर्षांमध्ये केलेल्या विविध विकास कामांची आणि योजनांची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. सध्याचे सरकार हे देशातील महापुरुषांच्या मार्गदर्शनावर चालणारे सरकार असून हे सरकार पूर्णपणे सामान्य जनतेला समर्पित आहे, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.





 
दरम्यान याचवेळी संत कबीर यांच्या शिकवणीवर आधारित 'संत कबीर अकादमी' या २४ कोटी रुपयाच्या प्रकल्पाचे उद्घाटन देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील याठिकाणी उपस्थित होते. संत कबीर यांची शिकवण अवघ्या जागापर्यंत पोहोचवणे हेच केंद्र आणि राज्य सरकारचे उद्देश असून लवकरच या अकादमीचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन योगी यांनी यावेळी दिले.  
@@AUTHORINFO_V1@@