निवृत्तीनाथ पालखी त्र्यंबकेश्वरहून रवाना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |




नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूर वारीसाठी आज त्र्यंबकेश्वरमधून प्रस्थान झाले. यंदा निर्मळ वारी, हरित वारी, प्लास्टिकमुक्त वारी असा अनोखा संकल्प करण्यात आला आहे. त्र्यंबक तालुक्यातील खेड्यातील अनेक भाविक पालखी दर्शणासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले होते. त्र्यंबक ते तळेगावपर्यंत अनेक भाविक पालखीला मान देण्यासाठी पायी जात असतात.

यावेळी तळेगाव, जातेगाव, वेळूणजे , वाढोली, अंजनेरी, सापगाव, तळेगाव कचुर्ली, हरसूल परिसरातील अनेक भाविक दाखल झाले आहेत. पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. पालखी कुशावर्तावर आली. त्यावेळी मोठी गर्दी झाली होती. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात परिसरातील ४० ते ४५ दिंड्यांचे सुमारे २० ते २५ हजार वारकरी सहभागी होतील. यंदा प्रथमच पालखी सोहळ्याच्या नियोजनात केवळ संस्थानांचा सहभाग न ठेवता २५ वर्षापासुन नियमित पणे वार करणाऱ्या वारकऱ्यांच्या प्रतिनिधींचा ही समावेश नियोजन समितीमध्ये करण्यात आला आहे. पालखी सोहळ्याचे नियोजन या समितीमार्फत होत आहे. नाशिक, नगर, सोलापूर या तीन जिल्ह्यांतून पालखी जात असल्याने या जिल्ह्यांच्या एका ठराविक जागेवर तीन अश्व रिंगण हेाणार असल्याची माहती नियोजन समीतीच्या वतीने देण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@