मोदी संविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार : आठवले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |

 

 
उल्हासनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असल्याचा गौरव खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा केला आहे. तसेच, संविधानाला, आरक्षणाला आणि ऍट्रोसीटी कायद्याला केंद्र सरकारचे पूर्ण संरक्षण राहील याचीही ग्वाही मोदींनी अनेकदा दिली आहे. त्यामुळे मोदी सरकार संविधान बदलणार, हा विरोधकांचा अपप्रचार असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
 

उल्हासनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या एका कार्यक्रमात रामदास आठवले बोलत होते. आठवले यावेळी म्हणाले की, भारताने पाकिस्तानशी लढाई केली तर पाकिस्तान शिल्लक राहणार नाही. उल्हासनगरात मोठ्या संख्येने सिंधी समाज आहे. सिंधी समाज पाकिस्तान मधून भारतात आला आहे. मेहनतीने भारतात राहणारा राष्ट्रप्रेमी सिंधी समाजाने प्रगती केली आहे. सिंधी समाजाला आरक्षण देण्याची झालेली मागणी योग्य असून त्यासाठी आपण प्रयत्न करू, असेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच, ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही त्या समाजांना जातींना स्वतंत्र प्रवर्ग करून आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी आराक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्यात यावी. सामाजिक आरक्षण ५० टक्के आणि आर्थिक निकषावरील आरक्षण २५ टक्के करून त्यातच मराठा, जाट, गुज्जर या जातींप्रमाणे सिंधी समाजाला ही आरक्षण देण्यात यावे, अशीही मागणी आठवले यांनी यावेळी केली.

@@AUTHORINFO_V1@@