आमदार कन्यादत्तक योजना राबविणार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |




बदलापूर: आमदार कन्यादान योजना यशस्वी झाल्यामुळे आता यापुढे ज्या मुलींचे पितृछत्र हरवले, अशा मुलींना दत्तक घेऊन त्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार आहोत. यासाठी ’आमदार कन्यादत्तक योजना’ राबविणार असल्याचे आ. किसन कथोरे यांनी जाहीर केले. भिवंडी येथील अमरसिंग चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने अंबरनाथ तालुक्यातील १८ शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम अंबरनाथ तालुक्यातील राहाटोली या गावातील शाळेत आज झाला. यावेळी आ. कथोरे यांनी वरील योजना जाहीर केली.

 

जिल्हा परिषदेच्या शाळा दुर्लक्षित राहू नये यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही भूमिका घेतलेली आहे. परिणामी मुरबाड मतदारसंघातील तीनही तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था चांगली असल्याचे आ. कथोरे म्हणाले. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम आहे.त्या शाळेमधील शिक्षक व मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मेहनत घेत असतात, असे गौरवोद्‍गारही त्यांनी काढले.

 

राजकीय कारकिर्दीला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून ’आमदार कन्यादान योजना’ जाहीर केली होती. या योजनेत विधवा महिलांच्या कन्यांचे कन्यादान आपण करीत आहोत. त्यांच्या विवाहाची जबाबदारी घेतल्याने त्या कुटुंबाचे मानसिक दडपण कमी झाले आहे. आतापर्यंत सुमारे दीडशे कन्यादान केले आहे. ही योजना यशस्वी झाली आहे. आता ज्या मुलींचे पितृछत्र हरपले आहे, अशा कन्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणारी आमदार कन्या दत्तक योजना सुरू करणार असल्याची घोषणा आ. कथोरे यांनी यावेळी केली. अमरसिंग चौधरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कांतीलाल राजपूत यांचेही यावेळी भाषण झाले. किसन पवार यांनी सूत्रसंचालन केले तर सुधीर गायकवाड यांनी आभार मानले.

@@AUTHORINFO_V1@@