घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले, दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
मुंबई : मुंबईमधील घाटकोपरमध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये आज चार्टर्ड विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात एक विमान चालक तीन तंत्रज्ञ आणि एका पादचाऱ्याचा समावेश आहे. घाटकोपरमधील वस्तीच्या ठिकाणी हे विमान पडले असल्याने मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी आत मदत कार्य सुरु झाले आहे. सर्वोदय रुग्णालयाजवळ हे विमान कोसळले आहे. 
 
 
 
मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. कॅप्टन राजपूत , कॅप्टन मारिया, इंजिनीअर सुरबी, टेक्निशियन मनीष पांडे अशी या मृतांची नावे आहे. VTUPZ किंगएअर सी ९० हा या चार्टर्ड विमानाचा क्रमांक होता. जवळच्या परिसरात अचानक आग दिसल्याने आजूबाजूचे नागरिक घाबरले मात्र काही काळानंतर घटनास्थळी गेल्यावर विमान कोसळले असल्याची माहिती मिळाली. 
 
 
 
या दुर्घटनेत जीवितहानी झाली आहे मृतांचे शव शोधले जात असून त्यांना त्वरित कुटुंबियांकडे स्वाधीन केले जाणार आहे. विमान कोसळले तेव्हा अचानक मोठा आवाज झाला तेव्हा आजूबाजूचे नागरिक घाबरून गेले. त्यानंतर घटनास्थळी हळूहळू गर्दी वाढली. सध्या घटनास्थळी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@