उपविभागीय अभियंता गैरहजर असल्याने खुर्चीला घातला हार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |

रावेर येथील प्रकार: संतप्त नगरसेवकांचे ‘गांधीगिरी’ने अनोखे आंदोलन

 
 
रावेर - येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात उपविभागीय अधिकारी हजर नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून रस्त्यासंदर्भात मागण्यांचे निवेदनही खुर्चीला देण्यात आले आहे. शहरालगत न.पा. हद्दीबाहेरून जाणारा उटखेडा-भाटखेडा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात जागो-जागी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे ये-जा करणार्‍या नागरिकांना प्रवास करण्यात खूप अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे लहान मोठ्या अपघातांचा धोकाही वाढला आहे.
 
 
याप्रश्‍नी लक्ष वेधण्यासाठी व न्याय मिळण्यासाठी बुधवार रोजी या कार्यालयावर नगरसेवक ऍड.सूरज चौधरी, सुधीर पाटील, सभापती शेख सादिक, ऍड. योगेश गजरे, पंकज चौधरी, अकील शेख, राहुल पाटील, परेश चौधरी, अमोल कासार, अनिल पाटील, सोनू अग्रवाल, शुभम नमायते यांनी धडक मारली. पण तेथे कोणीच नसल्यानेे हिरमोड होत संतापही झाला.
तिघे शाखा अभियंताही गैरहजर
येथील कार्यालयात उपविभागीय अधिकारी, तर तीन शाखा अभियंता पैकी कोणीही उपस्थित नव्हते, तेव्हा दाद मागायची कुणाकडे?... असा प्रश्‍न उपस्थित झाला, तेव्हा संतप्त झालेल्या नगरसेवकांनी शेवटी रस्त्यासंदर्भात निवेदन आणि हार खुर्चीला घालून अधिकार्‍यांविरुद्ध गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदविला.
 
@@AUTHORINFO_V1@@