जळगावसाठी ‘एअर डेक्कन’ नको!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |

सेवा समाधानकारक नसल्याची चंद्रकांतदादांची केंद्राकडे तक्रार

मुंबई :
जळगाव आणि कोल्हापूर येथून मुंबईला हवाई वाहतूक सेवा देणारी एअर डेक्कन ही कंपनी समाधानकारक सेवा देत नसल्याने बदलावी, अशी विनंती या दोनही जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्राला केली आहे.
 
 
जळगाव आणि कोल्हापूर ही दोन्ही ठिकाणे हवाईमार्गे मुंबईला जोडली गेली आहेत. या विमानसेवांना चांगला प्रतिसादही मिळत आहे मात्र, एअर डेक्कनने त्यांच्या वैमानिकांचा अनेक महिन्यांचा पगारच न दिल्याने वैमानिकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्याचा फटका या विमानसेवांना बसत आहे. या विमानसेवांबाबत बर्‍याच तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अखेर बुधवारी चंद्रकांतदादांनी केंद्राकडे याविषयी तक्रार केली. एअर डेक्कन विमानसेवा समाधानकारकपणे चालवत नसल्याने त्यांच्याकडून ही सेवा काढून घ्यावी, असा प्रस्ताव राज्याचे पर्यटनमंत्री मदन येरावार यांच्यामार्फत केंद्राकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@