जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची क्रियाशिलता १४ हजार ७३० प्रकरणे निकाली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Jun-2018
Total Views |




नाशिक : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने आपली क्रियाशिलता दाखवत गत सहा महिन्यात धडक मोहिम राबवित १६ हजार १७३ प्रकरणांपैकी तब्बल १४ हजार ७३० प्रकरणे निकाली काढली आहेत. प्रलंबित १३८२ प्रकरणांपैकी ८८२ प्रकरणे अर्जदार यांच्या पातळीवर त्रुटी अभावी प्रलंबित आहेत. उर्वरित ५०० प्रकरणे ८ दिवसापूर्वी समितीकडे जमा करण्यात आली आहेत. मुदतीच वैधता प्रमाणपत्र मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्या वंदना कोचुरे यांनी दिली.

 

तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार २५ जून पर्यंत प्राप्त झालेली प्रकरणे निपटारा करणेसाठी जात पडताळणी समिती स्तरावर कार्यालयीन वेळेनंतर ही छाननी करण्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे समितीकडून २५ जून पर्यंत ९ हजार ८४२ प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत व उर्वरित प्रकरणांवर तात्काळ निर्णय घेण्याची कार्यवाही चालू आहे. त्याचबरोबर समितीत आज रोजी दोन हजार ६६० वैधता प्रमाणपत्रे तयार असून अर्जदाराने किंवा पालकांनी कार्यालयात येऊन जात वैधता प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे. समितीने २१ ते २५ मे या कालावधीत शिबीर घेतले. तसेच त्रुटी पूर्तता करण्याबाबत ३ हजार ७५ दूरध्वनी लघुसंदेश पाठविण्यात आले. त्रुटी पूर्तता कॅम्पमध्ये २ हजार १५८ त्रुटींची पूर्तता करुन त्रुटी जमा करण्यात आल्या आहेत. वेळेत अर्जदारांना वैधता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आली. सद्य:स्थितीत नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज जमा करणाऱ्यांची गर्दी आहे. तसेच ज्या प्रकरणात त्रुटी आहे अशा त्रुटींची पूर्तता अर्जदाराने न केल्याने प्रकरणे प्रलंबित असल्याची माहीती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

@@AUTHORINFO_V1@@