सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रकधारकांना मीठ विक्री होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |






प्रायोगिक तत्त्वावर पुणे, नागपूरमध्ये लोह, आयोडिनयुक्त मीठ मिळणार


मुंबईः सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लोह आणि आयोडीनयुक्त मीठ १२ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर पुणे आणि नागपूर येथील शिधापत्रधारकांना रास्त भाव दुकानांमार्फत वितरित करण्यास राज्यशासनाने मान्यता दिली आहे. देशात आणि राज्यात निमियाचे प्रमाण वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून टाटा ट्रस्टच्या सहकार्याने शासनाला हे मीठ देण्यात येणार आहे.

 

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार राज्यातील ६ महिने ते ५ वर्षे या वयोगटातील ५३ .८ टक्के मुलांमध्ये आणि १५ ते ४९ या वयोगटातील ४८ टक्के महिलांमध्ये निमियाचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. आहारात लोहाचे पुरेसे प्रमाण असल्यास हे आटोक्यात आणता येणार असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने लोहयुक्त गोळ्या देण्याचे तसेच इतर पर्यायी व्यवस्था केली होती. तसेच यानंतर लोह आणि आयोडिनयुक्त मीठ वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाने टाटा ट्र्स्टकडे सादर केला होता. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पुणे आणि नागपूरमधील शिधापत्रकधारकांना प्रायोगिक तत्त्वावर टाटा ट्रस्टद्वारे मीठ विक्री करण्यात येणार आहे. दरम्यान, अधिकृत रास्त भाव दुकानदारांमार्फत हे मीठ १४ रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यात येणार आहे. टाटा ट्रस्ट शासनाला हे मीठ ११ रुपये दराने देणार असून शासन रास्त भाव दुकानदारांना १२ .५० पैशांनी देणार आहे तर दुकानदारांना १४ रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच गोदामांपासून हे मीठ रास्त भाव दुकानांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, दि.  जुलैपासून या मिठाची विक्री करण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@