नरेंद्र मोदी यांनी घेतली निकी हॅले यांची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे अमेरिकेच्या राजदूत निकी हॅले यांनी भेट घेतली. निकी हॅले या २६ ते २८ जून दरम्यान भारत दौऱ्यावर आल्या आहेत. काल निकी हॅले यांचे भारतात आगमन झाले आणि त्यांनी दिल्ली येथील हुमायुचा मकबरा येथून आपल्या भारत दौऱ्याची सुरुवात केली. भारत आणि वॉशिंग्टन या दोघांमध्ये संबंध मजबूत व्हावे हा उद्देश ठेवून निकी हॅले याचा भारत दौरा असणार आहे. 
 
 
 
 
 
निकी हॅले या मुळच्या भारतीय आहेत. त्यांचे वडील आणि आई या मुळच्या पंजाबच्या आहेत. मात्र निकी हॅले यांनी मायकल हॅले यांच्याशी लग्न केले आणि त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व प्राप्त झाले. निकी हॅले या २०१३ मध्ये भारत भेटीला आल्या होत्या. निकी हॅले यांनी अमेरिकेच्या दुसऱ्या आणि पहिल्या महिला गव्हर्नर पदाचा मान प्राप्त केला आहे. भारत आणि वॉशिंग्टन यांच्यात चांगले संबंध प्रस्तापित व्हावे यासाठी त्यांनी हा दौरा केला आहे. 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@