शिक्षक मतदार संघाची उद्या मतमोजणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |



 

नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतमोजणीस उद्या (दि. २८) रोजी प्रारंभ होणार असुन किचकट अशा मतमोजणी पद्धतीमुळे व १६ उमेदवारंची मतमोजणी करावयाची असल्याने ती संपण्यास २९ जून उजाडणार आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तथापि, निकाल लवकर लागण्यासाठी निवडणूक अधिकारी यात काही बदल करण्याची शक्यता आहे. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीसाठी नाशिक, नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. एकूण ४९७४२ मतदारांनी मतदान केले आहे. एकूण २० टेबलवर मतमोजणी करण्यात येणार आहे.
 

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी मतमोजणीस्थळी मतमोजणी कर्मचारी, अधिकार्‍यांचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी नाशिक विभागात ९२.३५ टक्के मतदान झाले होते. विभागातील सर्व जिल्ह्यांमधून मतपेट्या पोलीस बंदोबस्तात नाशकात आणण्यात आल्या. शेवटची पेटी नंदुरबार जिल्ह्यातून मंगळवारी पहाटे ५ वाजता पोहोचली. या सर्व पेट्या अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊस येथे जमा करण्यात आल्या असून, याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येईल. या मतमोजणीची रंगीत तालीम व पूर्वतयारीचा भाग म्हणून बुधवारी दुपारी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

@@AUTHORINFO_V1@@