राज ठाकरे याच्या घरा समोर प्राध्यापकाचा आत्महत्येचा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |






मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थान कृष्णकुंज समोर प्राध्यापकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सदर व्यक्ती ही रहेजा महाविद्यालयात कला विभागातच कार्यरत आहे.
 
सदर व्यक्ती या रहेजा महाविद्यालयात कला विषयाचे प्राध्यापक असून कॉलेज प्रशासन हा विभाग बंद करत आहे. याविरोधात गेल्या चार वर्षांपासून आपला लढा सुरू आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही उपयोग झाला नसल्याचा आरोप त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. तसेच राज ठाकरे हे आपले आवडते नेते असून त्यांना कलेविषयी जाण आहे. त्यांच्यामार्फत आपल्या लढ्याला दिशा मिळेल म्हणून त्यांच्या घराबाहेर आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

@@AUTHORINFO_V1@@