धुळ्यात समता दिंडीद्वारे सामाजिक न्यायाचा संदेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |
 
धुळे :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस २६ जून हा दिवस आज राज्य शासनातर्फे सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयापासून समता दिंडी काढण्यात आली. या दिंडीने सामाजिक न्यायाचा संदेश देत तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
 
 
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस, समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त जितेंद्र वळवी आदी उपस्थित होते.
 
 
त्यानंतर काढण्यात आलेल्या समता दिंडीला जिल्हाधिकारी रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गंगाथरण डी. यांनी हिरवा झेंडा दाखविला. या दिंडीत शिक्षक, शिक्षिका, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेली ही दिंडी जिजामाता कन्या विद्यालय, महानगरपालिका, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमार्गे कमलाबाई कन्या विद्यालयाजवळ पोहोचली व तेथे दिंडीचा समारोप झाला. त्यानंतर मादक पदार्थांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच सामाजिक न्याय विभागातर्फे आजचा दिवस व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन व अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा देत तरुणांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.
@@AUTHORINFO_V1@@