रावेर उपविभागीय अभियंता नसल्याने खुर्चीला घातला हार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |

नगरसेवकांचे ‘गांधीगिरी’ने अनोखे आंदोलन

रावेर, २७ जून :
येथील सार्वजनिक बांधकाम विभागात उपविभागीय अधिकारी नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून विभागाला रस्त्या सर्ंदभात निवेदन देण्यात आले आहे.
 
 
शहरालगत नगरपालिका हद्दीबाहेरून जाणारा उटखेडा-भाटखेडा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात जागो-जागी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे ये-जा करणार्‍या नागरिकांना प्रवास करण्यात खूप अडचण निर्माण होत आहे. यासाठी बुधवारी नगरसेवक ऍड.सूरज चौधरी, नगरसेवक सुधीर पाटील, आरोग्य सभापती शेख सादिक, माजी नगरसेवक ऍड.योगेश गजरे, युवाशक्ति फाउंडेशनचे पंकज चौधरी, अकील शेख, राहुल पाटील, परेश चौधरी, अमोल कासार, अनिल पाटील, सोनू अग्रवाल, शुभम नमायते आदी उपस्थित होते.
 
 
अधिकार्‍यांविरुद्ध गांधीगिरी पद्धतीने निषेध
येथील कार्यालयात उपविभागीय अधिकारी, तर तीन शाखा अभियंता पैकी कोणीही उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी शेवटी रस्त्यासर्ंदभात निवेदन आणि हार खूर्चीला घालून अधिकार्‍यांविरुद्ध गांधीगिरी पद्धतीने निषेध नोंदविला.
@@AUTHORINFO_V1@@