लष्कराचे सुखोई विमान कोसळले : जीवित हानी नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |


 
 
नाशिक : भारतीय हवाई दलाचे सुखोई ३०-२१० हे लढाऊ विमान आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंपळगावच्या शिरवाडे वणी येथे कोसळले. वैमानिकांनी इमर्जन्सी पायलट स्वीचद्वारे सुरक्षित लँडींग केल्याने जीवितहानी टळली.
 
ओझर येथील `एचएएल'च्या हवाई तळावरून नियमित सरावासाठी विमानाने उड्डाण केले होते. त्यानंतर त्यात तांत्रिक बिघाड जाणवल्याने वैमानिकांनी नियंत्रण कक्षाला याविषयी संदेश दिल्याचे वृत्त आहे. याविषयी कोणतीही अधिकृत माहिती `एचएएल'कडून मिळालेली नाही.
या घटनेनंतर लष्करी अधिकारी आणि नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@