जळगाव मनपा निवडणूक : भाजपाची उमेदवार चाचपणी सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |
 
 
 
जळगाव, २७ जून :
जळगाव महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक घोषीत झाली असून १ ऑगस्ट रोजी ७५ जागांसाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने उमेदवार चाचपणी करण्यात भाजपाने पुढाकार घेतला आहे. बुधवारी, सकाळी ११ वाजेच्या सुमारास आमदार सुरेश भोळे यंाच्याहस्ते ईच्छुक उमेदवारांना अर्ज देण्यात आले.
 
 
भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात बुधवारी, ११ वाजता आ.सुरेश भोळे यांच्या हस्ते ४६ ईच्छुक उमेदवारांना अर्ज देण्यात आले. या अर्जात उमेदवारांना त्यांची माहिती, त्यांनी त्यांच्या ईच्छुक प्रभागात केलेले कार्य याची माहिती आणि उमेदवारी न मिळाल्यास तुमची भूमिका कोणती हे भरुन २९ जूनपर्यंत अर्ज सादर करायचे आहे. तसेच या अर्जात उमेदवारी सादर करतांना कोणते कागदपत्रे आवश्यक आहे त्याची सर्व माहिती दिलेली आहे.
 
 
अर्ज वाटप प्रसंगी जिल्हा सरचिटणीस महेश जोशी, विशाल त्रिपाठी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, हेमंत भंगाळे, महिला आघाडी अध्यक्षा जयश्री पाटील, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, सुनिल माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ईच्छूक उमेदवारांनी अर्ज भरुन दिल्यानंतर उमेदवारांच्या मुलाखती घेवून उमेदवारी निश्चीत केली जाणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@