नाल्याच्या भिंतीला भगदाड दुरुस्तीकडे दुर्लक्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |





डोंबिवली : राज्यात गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली तशीच जोरदार हजेरी या पावसाने कल्याण-डोंबिवलीतही लावली. पावसामुळे डोंबिवलीतील सखल भागात पाणी साचले होते, मात्र पूर्वेतील एमआयडीसी भागातील नाल्याच्या भिंतीला भगदाड पडल्याने या ठिकाणी सर्वत्र पाणी पसरले होते. मात्र याच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसी व केडीएमसीकडून टोलवाटोलवी केली जात असल्याने समस्या जैसे थे राहणार आहे

 

पूर्वेतील मिलापनगर परिसरात सुयोग हॉटेलसमोर असलेल्या नाल्याची अवस्था दयनीय आहे. येथील सर्व्हिस रोडला लागून असलेला नाला रहिवाशांच्या घराशेजारी असून या नाल्याच्या भिंतीला भगदाड पडले आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामध्येे एमआयडीसी निवासी भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात नाल्याचे पाणी व गाळ मिलापनगर, सुदर्शननगरमध्ये घुसून परिसर जलमय झाला होता. सदर दुर्घटनेची माहिती केडीएमसी आपत्कालीन विभाग व एमआयडीसीला येथील नागरिकांनी दिली. तरीही केडीएमसी व एमआयडीसी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत. अरुण जोशी या रहिवाशांच्या घराशेजारी या नाल्याची भिंत असून पाण्याच्या प्रवाहाने त्यांच्या घराच्या संरक्षक भिंतीला तडे गेल्याची बाब ही समोर आली आहे

 

याबाबत वारंवार तक्रार करूनही लक्ष दिले जात नसल्याने केडीएमसी व एमआयडीसी दोघांनीही शासकीय यंत्रणा कोणत्या तरी मोठ्या आपत्तीची वाट पाहत आहेत का? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत. या संदर्भात एमआयडीसी अधिकारी संजय ननावरे यांच्याशी संपर्क साधला असता हे काम केडीएमसीकडे असल्याचे सांगण्यात आले तर केडीएमसी जलअभियंता चंद्रकांत कोलते यांच्याशी संपर्क साधला असता हे काम लवकरच केले जाईल, असे सांगण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@