‘मिशन ५० प्लस’साठी भाजपही सरसावला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |

आजपासून इच्छुकांना अर्जवितरण, महिनाअखेर मुलाखती

 
 
जळगाव :
जळगाव मनपात ‘मिशन ५० प्लस’ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजप सरसावला असून, बुधवार २७ जूनपासून इच्छुकांना अर्जांचे वितरण केले जाणार आहे. महिनाअखेर मुलाखती होतील, अशी माहिती पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांनी दिली.
 
 
शहराच्या विकासासाठी मनपा ताब्यात घेण्यासाठी भाजपने सुक्ष्म नियोजन केेले आहे. त्यासाठी ‘मिशन ५० प्लस’ उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भाजपकडून निवडणूक लढविण्यास इच्छुकांना २७ ते २० जूनपर्यंत अर्जवितरण केले जाणार असून, ३० जून आणि १ जुलै रोजी मुलाखती होणार आहेत. सर्वच १९ प्रभागात उमेदवार देण्याची तयारी पक्षाने केली असल्याची माहिती आ. भोळे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
 
खाविआसमोर पेच
खान्देश विकास आघाडीनेही १९ प्रभागात स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. आघाडीकडे १०० इच्छुकांची यादी तयार असून, यापैकी ७५ जणांची नावे अंतिम केली जाणार आहेत. आघाडीकडून निवडणूक लढविण्यास अनेकजण इच्छूक आहेत. प्रभाग क्रमांक ५, प्रभाग क्रमांक ६ साठी तर अनेक दावेदार आहेत. यात नवखे आणि माजी नगरसेवकांचाही भरणा मोठा आहे. स्वबळाची तयारी करूनही भाजपसोबत युती झाली तर ७५ मधून काही नावे कमी करावी लागणार असल्याचे नितीन लढ्ढा यांनी सांगितले.
 
 
आघाडीबाबत बैठक
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा निर्णय येत्या दोन किंवा तीन दिवसात होणे अपेक्षित आहे. यादरम्यान दोन्ही पक्षांनी एकमेकांसाठी किती आणि कोणत्या जागा सोडायच्या हे ठरेल. यानंतर मुलाखती व अर्जवाटप प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती माजी मंत्री व राष्ट्रवादीचे सदस्य गुलाबराव देवकर यांनी दिली.
 
@@AUTHORINFO_V1@@