जीएसटी लागू झाल्यानंतर सोन्याच्या अवैध व्यवहारात झाली वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Jun-2018
Total Views |

विक्रीच्या वेगवेगळ्या ठिकाणी तपासणीचा अभाव अवैध व्यवहाराचे कारण
देशातील सोन्याची वार्षिक मागणी ८०० ते ८५० टन, द. भारताचा ४० % वाटा

 
 
आयात शुल्कवाढीमुळे अक्रोड महागणार
डाळींच्या किंमती, उपलब्धतेवर नाही होणार परिणाम
गेल्या वर्षीच्या एक जुलैपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात आलेला आहे. सोन्यावर तीन टक्के जीएसटी व दहा टक्के आयात शुल्क त्यानंतर मात्र दक्षिण भारतातील सोन्याच्या अवैध व्यवहारात वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. देशातील सोन्याची सर्वात मोठी बाजारपेठही येथेच आहे. दक्षिण भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्येही भरपूर सोने गोळा होत असते. विदेशातूनही मोठ्या प्रमाणावर अवैध सोने येत असते. याचे प्रमुख कारण म्हणजे विक्रीच्या वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येत नसलेली तपासणी होय.
याआधी अशा प्रकारची तपासणी होत असल्याने बेकायदेशीर व्यवहारांना आळा बसत होता.केरळ आणि तामिळनाडू ही अवैध व्यवसायाची केंद्रे झाली आहेत. शेजारील देशांकडून अवैध सोन्याचा ओघ सुरु झालेला आहे.त्यामुळे ज्वेलरी व्यवसायाची खूपच अडचण होऊ लागली आहे. याचे कारण असे की, हे अवैध सोने कमी किंमतीत विकण्यातयेत आहे. त्याच्या परिणामी बाजाराची घडीच विस्कटून गेली आहे. देशात सोन्याची वार्षिक मागणी ८०० ते ८५० टन असून त्यात दक्षिण भारताचा हिस्सा ४० टक्के इतका आहे. त्याखालोखाल पश्‍चिम भारतात २५ टक्के, उत्तर भारतात २० टक्के व पूर्व भारतात १५ टक्के सोन्याची विक्री होत असते. अवैध व्यावसायिक कुठलाही कर न भरता अनेक राज्यांमध्ये सोन्याची तस्करी (स्मगलिंग) करीत असतात. त्यानंतर ते सोन्याचे रुपांतर दागिन्यांमध्ये करुन थेट सेलिंग एजन्ट्सद्वारे ते लोकांना विकले जातात.
 
 
जीएसटी यंत्रणेत तपासणीसाठी एक मोठे क्षेत्र सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे तपासणीचा अधिकार कोणाला व ती कशाप्रकारे केली जाईल ते नीट समजत नाही. याच्या परिणामी सोन्याच्या व्यापाराची प्रभावी देखरेख व पडताळणी होऊ शकत नाही. अवैध धंदेवाले नेमके याचाच फायदा घेत असून कर बुडविण्यासाठी त्यांनी नवीन फंडे तयार केले आहेत. म्हणजेच तपासणीचे काम व्यवस्थितरीत्या होत नाही.
 
 
अमेरिकेतून येणार्‍या कृषी उत्पादनांवर अतिरिक्त आयात शुल्क लावण्याच्या भारताच्या पावलामुळे अक्रोडाचे भाव लवकरच वाढणार आहेत. याशिवाय येत्या जुलैपासून सफरचंदांच्या किंमतीतही वाढ केली जाणार आहे. याचा लाभ हिमाचल प्रदेश व जम्मू आणि काश्मिरच्या शेतकर्‍यांना होणार आहे. अक्रोडाचे भाव १० ते १५ टक्के तर सफरचंदांची कापणी जुलैपासून सुरु होणार्‍या हंगामात ८ ते ९ टक्क्यांनी भाव वाढणार आहेत. भारत आपली देशांतर्गत गरज भागविण्यासाठी अमेरिका, चिली व युक्रेनमधून अक्रोडाची आयात करीत असतो. अमेरिकेतून आयातीवर वाढीव शुल्क लावण्यात आल्याने आता चिली, युक्रेन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, पोलंड व बेल्जियम मधून अक्रोडाची आयात वाढण्याची शक्यता आहे. देशातील अक्रोडाचे उत्पादन २ लाख १८ हजार टन असून ते मुख्यत: जम्मू आणि काश्मिरमध्ये होत असते.
 
 
गेल्या मे पासून अक्रोडावरील आयात शुल्क ३० टक्क्यांवरुन वाढवून १०० टक्के करण्यात आले होते. आता येत्या ऑगस्टमध्ये ते आणखी वाढवून १२० टक्के इतके केले जाणार आहे. यामुळे किंमतींवर परिणाम होऊन किरकोळ भाव वाढणार आहेत. अक्रोडाचा भाव सध्या साडे चारशे ते साडे पाचशे रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. त्यात किलोमागे ७० ते ८० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. ऑस्ट्रेलिया, इराण व अफगाणिस्तानातून आयात होणार्‍या अक्रोडावर वाढीव आयात शुल्क लागू होणार की नाही ते समजू शकलेले नाहीे. सफरचंदावरील आयात शुल्क येत्या ऑगस्टपासून ५० टक्क्यांवरुन ७५ टक्क्यांपर्यंत वाढविले जाणार आहे. देशातील सफरचंदांचे उत्पादन १५ लाख टन असून अडीच लाख टन सफरचंदांची आयात केली जात असते. भारतातील सफरचंदांचा कापणी हंगाम फेबु्रवारी व मार्चमध्ये समाप्त झाल्यानंतर अमेरिकेतून त्यांची आयात केली जात असते. उत्तराखंडात याच महिन्यात तर जम्मू-काश्मिरात जुलैपर्यंत सफरचंदांची कापणी होत असल्याने वाढीव आयात शुल्कापोटी होणार्‍या देशातील मागणी व पुरवठ्यावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.फक्त हिमाचल प्रदेशातील सफरचंदांचे उत्पादन कमी झाल्याने सफरचंदांच्या किंमती ९ टक्क्यांनी वाढू शकतात असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. हिमाचल प्रदेशातील शेतकर्‍यांना गेल्या वर्षी ५५ ते ६६ रुपये प्रति किलोपर्यंत भाव मिळाला होता. यंदा त्यांना तो ६० ते ७० रुपयांपर्यंत मिळू शकतो. आयात शुल्क वाढविण्या चा परिणाम डाळींच्या किंमती व उपलब्धतेवर होणार नाही. डाळी व्यावसायिक कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतून हरभरा व मसुरीची आयात करु शकतात. देशातील डाळींचा मोठा साठा उपलब्ध आहे.
शेअर बाजारात किंचित वाढ, दोन्ही निर्देशांक सपाटीवर बंद
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजार घसरल्यानंतर आज मंगळवारी त्यात किंचित वाढ झाली. त्याचे दोन्ही महत्वाचे निर्देशांक सपाटीवर (फ्लॅट) बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) सोमवारच्या बंद ३५ हजार ४७० बिंदूंवरुन सकाळी ३५ हजार ३५५ बिंदूंवर उघडत ३५ हजार ६१६ बिंदूंच्या उच्च तर ३५ हजार ३३८ बिंदूंच्या नीचांकी पातळीपर्यंत जाऊन आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सोमवारच्या बंद १० हजार ७६२ बिंदूंवरुन सकाळी १० हजार ७४२ बिंदूंवर उघडून १० हजार ८०५ बिंदूंच्या वरच्या तर १० हजार ७३२ बिंदूंच्या खालच्या पातळीपर्यंत जाऊन परतला. दिवसअखेरीस सेन्सेक्स १९ बिंदूंनी वाढून ३५ हजार ४९० बिंदूंवर तर निफ्टी ६ बिंदूंनी वाढून १० हजार ७६९ बिंदूंवर बंद झाला. सोन्याच्या किंमतीत १६२ रुपयांची घट होऊन ते ३० हजार ४९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले होते.
 
@@AUTHORINFO_V1@@