काँग्रेसने सत्तासुखाच्या मोहापायी देशाचा तुरूंग बनवला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
काँग्रेसने सत्तासुखाच्या मोहापायी देशाचा तुरूंग बनवला

आणीबाणी हा लोकशाहीवरचा ‘काळा डाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर सडकून टिका 
 
 
मुंबई : काँग्रेसने सत्तासुखाच्या मोहाने देशाचा देशाचा तुरूंग बनवला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेली आणीबाणी म्हणजे लोकशाहीवरचा काळा डाग असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आणि त्यांच्या कार्यशैलीवर सडकून टिका केली. आणीबाणी विरोधात लढा देऊन लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अँड. आ. आशिष शेलार आदी मान्यवर उपस्थित होते इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात लादण्यात आलेल्या आणीबाणीला यावर्षी ४४ वर्षे पूर्ण होत असून २६ जून हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षातर्फे घेण्यात आला आहे.
 
 
४३ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशात पहिल्यांदा आणीबाणी लागू केली होती. २५ आणि २६ जूनच्या मध्यरात्री तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्या स्वाक्षरीनंतर देशात पहिल्यांदा आणीबाणी लागू झाली होती. दरम्यान, आणीबाणीच्या काळात काँग्रेसने संपूर्ण देशाची तुरुंगशाळा केली होती. एका कुटुंबासाठी घटनेचा दुरुपयोग करण्यात आला. स्वार्थासाठी पक्षाचे तुकडेदेखील केले गेले. आणीबाणी आणि महाभियोग ही कॉंग्रसची मानसिकता असून काँग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात आली, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. तसेच ज्यावेळी काँग्रेसमधील एका कुटुंबाला सत्ता जाण्याची भीती वाटते त्यावेळी त्यांनी देश संकटात सापडल्याचा डंका पिटला. देशात भीतीचे वातावरण असल्याचा बनाव करून आम्हीच देशाला वाचवू शकतो, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या गांधी घराण्यावर टिका केली. आणीबाणीच्या काळात तर मिसा कायद्याची भीती दाखवून धमकावले जायचे. अभियव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यात आला होता. संपूर्ण देशच जणू कैदखाना झाला होता, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच यावेळी माध्यमांवर घालण्यात आलेल्या बंदीचीही त्यांनी आठवण काढली. आणीबाणीच्या कालावधीत माध्यमांचा आवाज दाबण्यात आला होता, त्यावेळी माध्यमांना कशा प्रकारे वागणूक देण्यात आली होती हे माहित आहे का असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला.
 
 
काँग्रेसलाच आपल्या अस्तित्वाबद्दल भीती
 
भाजप आणि रा.स्व.संघाचे स्वयंसेवक मुस्लीमांवर अन्याय करत आहेत, तसेच दलित बांधव संकटात सापडला आहे, असे भय सध्या काँग्रेसकडून पसरवले जात आहे. जेव्हा स्वतःच्या अस्तित्त्वाबाबत काँग्रेसला भीती वाटू लागते तेव्हा त्यांच्याकडून अशा अफवा पसरवल्या जातात. ही त्यांची अस्तित्व टिकवण्याची धडपड असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
 
 
महाभियोग ही काँग्रेसची मानसिकता
 
सरन्यायाधीशांविरोधात काँग्रेसने आणलेल्या महाभियोगावरूनही पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधला. महाभियोग म्हणजे काँग्रेसची मानसिकता आहे. त्यांना देश, परंपरा, लोकशाही अशा गोष्टींशी काहीही देणघेण नाही. त्यामुळेच न्यायव्यवस्थेवर विश्वास न दाखवता त्यांनी सरन्यायाधिशांविरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल केल्याचे मोदी म्हणाले.
 
 
४०० वरून ४४ वर आल्यावर ईव्हिएमची आठवण
 
देशात अनेक निवडणुका झाल्या, सरकार पण बदलली. पण त्यावेळी निवडणूक प्रक्रियेवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही. परंतु लोकसभा निवडणुकीत ४०० वरून ४४ वर आल्यावर काँग्रेसला निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा साक्षात्कार झाल्याचे मोदी म्हणाले. तसेच कर्नाटक निवडणुकीनंतर मात्र त्यांना ईव्हिएम घोटाळ्याचा विसर पडल्याचे सांगत त्यांनी टोला हाणला.
 
 
किशोर कुमार यांनाही त्रास
 
कार्यक्रमादरम्यान, प्रख्यात पार्श्वगायक किशोर कुमार यांची आठवण काढत त्यांनाही आणीबाणीच्या झळा सोसोव्या लागल्याचे मोदी म्हणाले. आणीबाणीच्या कालावधीत प्रचाराची गाणी गाण्यासाठी काँग्रेसने त्यांच्याकडे विनंती केली होती. मात्र, किशोर कुमार यांनी ही गाणी गाण्यास नकार दिल्यामुळे त्यांना रेडिओ आणि दूरदर्शनवरून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे मोदी यावेळी म्हणाले.
 
 
काँग्रेसपासूनच संविधानाला धोका - मुख्यमंत्री 
 
काँग्रेस किंवा त्यांचे समविचारी पक्ष हे सतत संविधानाबाबत बोलत असताता. मात्र, संविधानाला काँग्रेसपासूनच धोका असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेली आणीबाणी हा लोकशाही मारक निर्णय होता. लोकशाही बुडवण्याचे काम काँग्रेसने केले असून आणीबाणीचा कालावधी हा देशाच्या इतिहासातला काळा कालखंड असल्याचे म्हटले तरी चुकीचे ठरू नये असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. दोन वर्षे आपल्या वडिलांना तरूंगात ठेवण्यात आले होते. त्यांच्याप्रमाणेच इतर लोकही संविधानाच्या बचावासाठी लढत होते. ज्यांनी त्यावेळी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांना तुरूंगात धाडण्यात आले. आता लोकशाही वाचवा असा गळा काढणारे त्यावेळी कुठे होते असा सवालही त्यांनी यावेळी केला. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@