बुलेट चोरी प्रकरणात फिर्यादी निघाला चोर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |

विम्याचे पैसे लाटण्यासाठी बनाव, ‘सांगकाम्या’ मित्रही ‘गोत्यात’

दोघांना २ दिवस पोलीस कोठडी
गुन्हा उघड करण्यात रावेर पोलिसांना यश
सीसीटीव्ही फुटेज आणि खबर्‍यामुळे बिंग फुटले
रावेर : बुलेट दुचाकीच्या चोरीचा बनाव करुन तिच्या चोरीची खोटी हा गुन्हा उघड करण्यात रावेर पोलिसांना यश आलं आहे. मोटारसायकल मालकानेच कट करून मित्राच्या मदतीने बुलेट गाडी चोरी केली असल्याचे निष्पन्न झालेआहे. पोलिसांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला अटक केली आहे, सोमवारी दोघाना रावेर न्यायालयात उभे केले असता न्यायासनाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
 
 
रवींद्रवर फायन्स कंपनीचे एक लाख चौर्‍याहत्तर हजार रु. कर्ज होते कर्ज फेडीसाठी पैशाची अडचण असल्यामुळे बुलेट चोरीचा कट रचला होता. बुलेट चोरी झाल्यावर विम्याचे पैसे लाटून कर्जाची परतफेड करण्याचा त्याचा विचार होता. महेंद्र महाजन याने ठरल्याप्रमाणे बुलेट गाडी चोरून नेली त्यानंतर रवींद्र भोईने रावेर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार ४७/१८ क्रमांकाने भारतीय दंड कलम ३७९ ,१२० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
 
तपासासाठी पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी एक पथक नेमले पथकातील पोलीस नाईक हरिलाल पाटील, जाकिर पिंजारी यांनी तपासाचे चक्र फिरविले व सीसीटिव्ही फुटेजमध्ये बुलेट चोरी करताना दिसत असलेला इसम हा खबर्‍यांच्या माहितीवरून बुलेटसहित मध्य प्रदेशातील लालबागच्या चिंचला भागातून महेंद्र महाजन यास ताब्यात घेतले व पोलिसी हिसका दाखवताच तो बोलता झाला व त्याने स्वत गाडी मालक याने बुलेट चोरी करण्याचे सांगितले व चावीही मालकांनी बनवून दिली म्हणून मी चोरी केली, अशी कबुलीही त्याने दिली. आणि पोलिसांनी गाडी मालक यालाही अटक केली. ही घटना उघडकीस आल्याने शहर व परिसरात उलटसुलट चर्चेला जोर आला आहे.
असा रचला बुलेट चोरीचा कट
याबाबत माहिती अशी की, रावेर शहरातील रहिवासी रवींद्र भगवान भोई यांनी आपल्याच मालकीची बुलेट मोटरसायकल रॉयल इन फिल्ड कंपनीची क्रमांक एम एच १९ डी डी ९१९४ च्या चोरीचा कट रचला व मध्य प्रदेशातील लालबागच्या चिंचला येथील रहिवासी मित्र महेंद्र नत्थू महाजन यास सोबत घेवून बुलेट चोरी केली.
 
@@AUTHORINFO_V1@@