कोंबड्यांचे वजन वाढण्यासाठी प्रतिजैविकांची विक्री?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |





प्रतिजैविकांबाबत न्यायालयाकडून सरकारला विचारणा


मुंबई : कोंबड्यांचे वजन वाढण्यासाठी तयार करण्यात येणा-या प्रतिजैविकाची सर्रास विक्री करण्यात येत असल्याची बाब नुकतीच उघडकीस आली आहे. कुक्कुटपालन व्यावसायिकडॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोंबड्यांना प्रतिजैविके देत असून त्यावर कोणत्याही प्रकारचा वचक नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत सरकारला विचारणा केली आहे.

दरम्यान, घातक रसायनांमुळे शेतक-यांचा जीव गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. तसेच ‘सिटिझन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर अ‍ॅण्ड एज्युकेशन’ या संस्थेने जनहितयाचिकेद्वारे ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. अशा प्रकारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची तक्रारही संस्थेने या याचिकेत नमूद केलीहोती. याचिकेवरील सुनावणी दरम्यान ‘नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे की भाज्यांचे उत्पादन आणि कोंबड्यांची विक्री महत्त्वाची आहे’, असा सवाल न्यायमूर्ती नरेश पाटीलआणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केला.

यावेळी बाजारात विक्रीसाठी येणा-या कोंबड्यांबाबतही न्यायालयाने सरकारला विचारणा केली. त्यावर कोंबडय़ांचे वजनवाढावे यासाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रतिजैविकांची सर्रास विक्री केली जात असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय या प्रतिजैविकांची विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले.दरम्यान, आपल्याकडे अशाप्रकारची कोणतीही इंजेक्शन उपलब्ध नाहीत आणि अशाप्रकारे आपल्याकडे पक्ष्यांचे वजन वाढवले जात नाही, अशी माहिती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ.दीपश्री देसाई यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. पक्षांचे वजन वाढण्याचे कारण म्हणजे चांगले पक्षी निवडून प्रजननातून पक्षांची पैदास केली जाते. त्यांना मिळणार्‍याचांगल्या खाण्यामुळे पाच ते सहा आठवड्यांत पक्षांचे वजन दोन ते तीन किलोच्या आसपास जाते. त्याचा इंजेक्शनशी कोणताही संबंध नसल्याचे डॉ. देसाई म्हणाल्या.

ही माहिती चुकीची..

आपल्याकडे अशाप्रकारचे कोणतेही इंजेक्शन मिळत नाही किंवा अ‍ॅण्टीबायोटीक्स देऊन वजन वाढवले जात असल्याबाबतही काही तांत्रिक तथ्य दिसत नाही. ही चुकीची माहितीपसरवली जात असून पक्ष्यांना हार्मोन्सची इंजेक्शन वगैरेही दिली जातात ही माहितीही चुकीची आहे. पक्ष्यांची पैदास करण्यात व वाढण्यात अनेक वर्षांच्या संशोधनाची मेहनतअसते.

डॉ. दीपश्री देसाई

सहाय्यक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय

@@AUTHORINFO_V1@@