रावेरला प्लास्टिकबंदीचीकठोर कार्यवाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |

५० किलो प्लास्टिक जप्त, ५ हजाराचा दंड, दुकानदारांमध्ये घबराट

 
रावेर :
पालिका मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांच्या नेतृत्वाखाली रावेर शहरात सोमवारी प्लास्टिक बंद मोहिमेत पहिल्याच दिवशीछोरिया मार्केटमधील बालाजी प्लास्टिक दुकानातून सुमारे ५० किलो प्लास्टिक जप्त आणि दुकान चालकाला पाच हजाराचा दंड करण्यात आला. यामुळे शहरात खळबळ माजली आहे.
 
 
महाराष्ट्रात प्लास्टिक बंद झाल्यानंतर येथे ही मोहीम स्टेशन रोड, छोरिया मार्केट परिसरातील दुकानांमध्ये तपासणी झाली. रवींद्र लांडे, आरोग्य निरीक्षक धोंडू वाणी, वसूली लिपिक दीपक सुरवाडे, रोखपाल गणेश महाजन, शांताराम पाटील, गणेश रणसिंगे, पकंज बागरे, नगीन जावे, अशोक माळी, नीलेश महाजन, पो. कॉं. मंदार पाटील आणि संदीप धनगर आदींनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.
 
@@AUTHORINFO_V1@@