पुण्यात भाजप नगरसेवकाची कोयत्याने हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |

 
 
पुणे - पुण्यात भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांची हत्या झाल्याने खळबळ माजली आहे. आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करत त्यांची हत्या केली आहे. ही घटना वडमुखवाडी येथे आज दुपारी चारच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे (वय-३३) वडमुखवाडी येथे आले होते. तेथून परत जाताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. कांबळे यांच्या डोक्यावर हल्लेखोरांनी वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.
 
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कांबळे यांना नागरिकांनी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आणले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हत्येचे कारण अद्याप समजले नाही, मात्र या हत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@