पनवेलच्या पाणी प्रश्नासाठी आ. प्रशांत ठाकूर यांचा पुढाकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |




पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत पाणीपुरवठ्याबाबत येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेत मंगळवार दि. २६ जून रोजी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या वेळी करावयाची उपाययोजना आणि भविष्यात घ्यावयाची काळजी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

पनवेल महापालिका हद्दीत पाणीटंचाई जाणवत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. सिडको, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ आणि महावितरण या विभागांमध्ये समन्वय नसल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी बोलावलेल्या बैठकीत लक्षात आले होते. त्यामुळे मंगळवारी आ. प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेत बैठक झाली. या बैठकीला महापौर डॉ. चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृहनेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, सभापती अमर पाटील, प्रकाश बिनेदार, अॅड. मनोज भुजबळ, नीलेश बावीस्कर, विकास घरत, दर्शना भोईर, विद्या गायकवाड, प्रभाग समित्यांचे अध्यक्ष, तसेच नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, नगरसेविका मुग्धा लोंढे आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी खांदा कॉलनी सोडून सगळीकडे पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक प्रभागातील अडचण आमदारांनी समजून घेऊन त्यावर काय उपाययोजना करता येईल, याबाबत विचारविनिमय केला. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची व लागणाऱ्या निधीला मंजुरी देण्याची आयुक्तांनी तयारी दाखवली. गाढेश्वर धरणाचे पाणी सुरू करणे, अमृत योजना पूर्ण होईपर्यंत धरणातील नवीन गाळ काढू नये म्हणजे मे महिन्यापर्यंत धरणातील पाण्याचा वापर करता येईल, पोदीला पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन खालून करावी, काही भागातील पाईप बदलावे लागतील त्यासाठी येणाऱ्या खर्चास तातडीने मंजुरी देण्यास तयार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ग्रामपंचायतीकडून वर्ग झालेल्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत मदतीला देण्याचेही यावेळी ठरले.

 

सिडकोच्या महापालिकेत सहभागी झालेल्या भागाचा पाण्याचा प्रश्न अमृत योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत सुटणार नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा करीत राहणे, सिडकोने ‘वॉटर ऑडिट’ केलेले नसल्याने त्यांच्या हद्दीतील योजनांचे १५ ते २० वर्षे जुने झालेले पाईप बदलणे आवश्यक आहे. त्याचा खर्च आता महापालिकेला करावा लागणार आहे. ओवळा धरणाचा गाळ काढून पिचिंग करावे लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले, तर बाळगंगा व कोंढाणे धरण पूर्ण झाल्यावर त्यातील पाणी पनवेलसाठी राखीव ठेवण्याची मागणी करण्याचे ठरले. आ. प्रशांत ठाकूर यांनी यावेळी आयुक्तांना भविष्यात पाणीटंचाई होऊ नये यासाठी आराखडा बनवा, असे निर्देश देऊन त्यासाठी लागणारे सहकार्य करण्याची तयारी दाखवली. पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना अनेक वर्षात पगारवाढ दिलेली नाही. अनेक कर्मचारी आठ-नऊ हजार रुपये पगारात काम करीत आहेत. त्यांना पगारवाढ देण्याचीही सूचना आ. ठाकूर यांनी केली. त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी आयुक्त म्हणाले की, आपल्या महापालिका हद्दीत सध्या २३७ एमएलडी पाणी लागते. सन २०२५ मध्ये ४६७ एमएलडी पाणी लागेल. त्याचा विचार करून आम्ही पाण्यासाठी आराखडा बनवित आहोत. सिडकोने नवीन नैना भागाला पाणी देताना प्रथम या भागाचा विचार करावा, अशीही मागणी करण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@