लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता केले लिफ्टचे उदघाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |



 

नाशिक : मध्य रेल्वेचे महत्त्वाचे स्थानक अशी ओळख असलेल्या मनमाड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. २, ३ व ५, ६ वर रेल्वे प्रशासनातर्फे दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी लिफ्ट बसविण्यात आल्या. गेल्या काही वर्षांपासून अधिकारीवर्गात स्वतःला मिरवून घेण्याची सवय लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्याचाच प्रत्यय मनमाड येथे बघायला मिळाला. सामान्यतः रेल्वेच्या प्रथेनुसार स्थानिक लोकप्रतिनिधी (खासदार) यांना व रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक किंवा जनरल मॅनेजर यांना निमंत्रित करून उद्घाटन केले जाते, पण स्वतःला मिरवून घेण्याची घाई झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांनी स्वतःच्याच हस्ते उद्घाटन केले. मनमाड रेल्वे स्टेशनचे मुख्य स्टेशन अधीक्षक सुनील गलांडे यांनी स्वहस्तेच उद्घाटन उरकून घेतले. कालच्या या उद्घाटन समारंभाबद्दल खा. हरिश्चंद्र चव्हाण यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून ते संबंधित प्रकरणाची रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे तक्रार दाखल करणार आहेत. रेल्वे प्रशासनातर्फे फक्त प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट सुरू करा, अशी तोंडी सूचना देण्यात आली होती पण या अधिकारीवर्गाने तिचे उद्घाटन थाटात करून टाकले. या पुर्वीदेखील २०१३-१४ साली अधिकारी वर्गाने आचार संहितेचे कारण देत पादचारी पुलाचे उद्घाटन स्थानिक खासदार हरिशचंद्र चव्हाण ह्यांना विश्वासात न घेता केले होते.

@@AUTHORINFO_V1@@