नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यास राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |
 
 जळगाव, २६ जून :
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा सामाजिक न्याय विभाग, दिल्ली केंद्र शासनाचा राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०१८ ने राष्ट्रपती व सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री यंाच्याहस्ते मंगळवार २६ रोजी गौरव करण्यात आला.
 
 
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य गेल्या ५९ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात २५ पदाधिकारी, ४० संघटक व ५०० स्वयंसेवक यांच्या प्रयत्नातून कार्यरत आहेत. व्यसनमुक्ती प्रचार, प्रसार, प्रबोधनाच्या माध्यमातून कार्यक्रम राबवत आहे. उपचार्थिंना व्यसनमुक्त करण्याचे काम करित समाजातील व्यसनांना हद्दपार करण्यासाठी सातत्याने मंडळ कार्यरत आहे. या कार्याची दखल केंद्र शासनाने घेत राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०१८ ने राष्ट्रपती रामनाथ कोविंद व सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांच्याहस्ते २६ रोजी गौरविण्यात आले. हा पुरस्कार नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल स.भा. मडामे यांनी स्विकारला. याप्रसंगी राष्ट्रपती यांनी आपण सर्व व्यसनमुक्तीचे ब्रॉण्ड ऍम्बेसेडर असल्याचे मनोगत व्यक्त केले.
 
 
नशाबंदी मंडळाला मिळालेला हा राष्ट्रीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाला म्हणजे काम संपलं नाही तर काम आत्ता सुरु झाले असून आता मंडळाची जबाबदारी वाढली आहे. यापुरस्कारचे श्रेय नशाबंदी मंडळाचे पदाधिकारी, संघटक, स्वयंसेवक, हितचिंतक यांचे असल्याचे मत वर्षा विद्या विलास व अमोल स.भा.मडामे यांनी मांडले.
@@AUTHORINFO_V1@@