डोंबिवलीत एमआयडीसी परिसरात गॅसगळती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |





डोंबिवली: पूर्वेतील एमआयडीसी विभागात गॅसगळती झाल्याचा प्रकार सोमवारी रात्रीच्या सुमारास घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.त्यामुळे येथील नागरिकांच्या वतीने आमच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 
 

पूर्वेतील औद्योगिक निवासी भागात सुमारे ६० टक्के नागरिकांकडे महानगरचे घरगुती गॅसजोडण्या असून अंदाजे २२५ सोसायट्यांना गॅसपुरवठा सुरू आहे, परंतु सोमवारी रात्री अकरानंतर विको नाका परिसरात गॅसची गळती झाल्याने कंपनीने मुख्य जोडण्या बंद केल्या. यामुळे सुमारे २२५ सोसायट्यांमध्ये सकाळी गॅसची बोंब झाली. तसेच रात्री उपासमारीचा प्रसंग ओढवला.निवासी भागातील रहिवाशांनी काल रात्री अकराच्या सुमारास गॅसचा वास येत असल्याची तक्रार केल्यानंतर महानगर कंपनीची दक्षता व्हॅन व कर्मचारी निवासी भागात आले. त्यांनी गळती कुठे लागली याचा तपास केला व त्यांना विको नाका परिसरात जमिनीखाली गळती सुरू असल्याचे लक्षात आले. म्हणून कर्मचार्‍यांनी मिलापनगर येथील मुख्य व्हॉल्व पॉईंट बंद केला व पाईपलाईनमधील गॅस बाहेर काढण्याचे काम सुरू केले. अखेर दुपारनंतर हा पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, या भागातील नागरिकांना या संदर्भात कोणतीही जनजागृती केली गेली नाही तर कोणत्याही प्रकारच्या तोंडी व लेखी सूचना देण्यात आल्या नसल्याची माहिती या भागातील रहिवासी राजू नलावडे यांनी दिली.

 
 

सदर गॅस हा जेवण तयार करण्यासाठी असणारा गॅस असल्याने याच्या संपर्कात एखादे रसायन आले असते तर आग लागू शकते, अशी माहिती अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आली. तर या संदर्भात या गॅस कंपनीच्या अधिकारी नीरा अस्थाना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

@@AUTHORINFO_V1@@