फिफा विश्वचषक स्पर्धेत आज खेळले जाणार चार सामने

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |
 
 
 
 
 
रशिया : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज तब्बल एकामागून एक चार सामने खेळले जाणार आहे. गट सीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पेरू यांच्यात सामना होणार असून हा सामना अतिशय अतीतटीचा मानला जात आहे. त्यानंतर डेन्मार्क आणि फ्रान्स यांच्यात सामना खेळला जाणार आहे. डेन्मार्क आणि फ्रान्स यांच्यात होणाऱ्या सामन्यावर देखील सगळ्यांच्या नजर खिळून राहणार आहे.
 
 
त्यानंतर अर्जेन्टीना आणि नायजेरिया यांच्यात खूपच अतीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आईसलँड आणि क्रोएशिया यांच्यात सामना होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत सध्या खूप अतीतटीचे सामने पाहायला मिळत आहे त्यामुळे आजच्या चारही सामन्यांकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 
 
या आठही देशांचा सामना एकमेकांविरोधात असल्याने आज मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणि व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे करण्याकडे लक्ष देण्यात आले आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेमुळे रशियामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन होत आहे. त्यामुळे रशियाची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. 
  
 
 
@@AUTHORINFO_V1@@