चाळीसगावला पर्यावरणस्नेही उपक्रम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |

वृक्षप्रेमींना ५ हजार संरक्षक पिंजर्‍यांचे वितरण
योजनांच्या लाभासाठी महिलांची मोफत नोंदणी

 
आ.उन्मेश पाटील यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने
फ्लेक्स बॅनर, अनावश्यक खर्चाला दिला फाटा
चाळीसगाव :
लोकप्रतिनिधीचा वाढदिवस म्हटला म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या व हितचिंतकांच्या उत्साहाला उधाण येते. तालुकाभर फ्लेक्स, बॅनर झळवकले जातात. मात्र या सवंग आणि हास्यापद वाटेने न जाता आपला मतदार मायबापांसाठी आणि कर्मभूमी शहरांच्या कल्याणासाठी आजची गरज असलेल्या पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी जनतेला सोबत घेत झटण्याचा विडा उचलत तालुक्याचे आमदार, उत्साही व संवेदनाक्षम युवा नेतृत्त्व उन्मेश पाटील यांनी सोमवारी २५ जून रोजी आपला वाढदिवस अतिशय अनोख्या पद्धतीने, दूरदृष्टी राखत साजरा केला.
 
 
सातत्याने सामाजिक उपक्रमांच्या आखणी, नियोजन आणि कार्यवाहीत मग्न आमदार उन्मेश पाटील यांनी यावेळी आपल्या वाढदिवसाला या सर्व बाबींना फाटा देत सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते. त्याला प्रतिसाद देत भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चा व सामाजिक संघटनांच्या सहभागाने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. अनावश्यक, दिखाऊ खर्च न करता साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याने सर्वच थरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. इतरांनीही यातून काही शिकावे, असा सूर व्यक्त होत होता. उपक्रम यशस्वीतेसाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या सेवाभावी, पर्यावरणप्रेमी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद आणि उत्साहाचे दर्शन घडवत परिश्रम घेतले.
 
* शहरातील ऑनलाईन नोंदणी केलेल्या ५ हजार नागरिकांना मोफत ट्री गार्ड (वृक्ष संरक्षक पिंजरे) वाटपाचा शुभारंभ आ. उन्मेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. * चाळीसगाव तालुक्यातील २ हजार कष्टकरी बांधकाम कामगार महिलांची विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मोफत नोंदणी देखील भूषण मंगल कार्यालय येथे आयोजित शिबिरात झाली.
 
@@AUTHORINFO_V1@@