नागरिकांच्या व पोलिसांच्या सतर्कतेने वरणगावच्या राष्ट्रीयकृत विजया बँकेत दरोडा फसला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |

दोघ आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद

 
 
वरणगाव, २६ जून :
येथील भुसावळरोडवरील महामार्गलगत असलेल्या राष्ट्रीयकृत विजया बँकेच्या मागच्या बाजूने भिंतीला असलेल्या खिडकीची जाळी टॉमीच्या साह्याने तोंडून प्रवेश करुन बँकेत चोरी करीत असतांना नागरीकांच्या व पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक यांच्या सतर्कतेने दरोडा फसल्याची घटना आज मंगळवार रोजी मध्यरात्री २ वाजेच्या दरम्यान घडली. दोघ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
याबाबत पोलिस सूत्रानी दिलेली माहिती अशी की , महामार्गाला लागून असलेल्या साधना नगरात गेल्या तीन ते चार वर्षापासून राष्ट्रीयकृत विजया बँक वरणगाव शहरात आल्यापासून चांगली सेवा मिळत असल्याने या बँकेत शासकीय निमशासकीय तसेच सर्वसामान्य नागरीकांचे बँकेत ग्राहकांचे खाते आहे. साधनानगरात असलेल्या विजया बँकेच्या मागच्या बाजूला भिंतीला असलेल्या खिडकीची लोखंडी जाळीला टॉमीने तोडून खिडकीतून संशयीत किशोर (ऊर्फ ) नरेश सुधाकर धनगर वय २० राहणार रामपेठ वरणगाव यांने बँकेत प्रवेश केला असता बँकेच्या आजूबाजूला राहणार्‍यां नागरीकांना बँकेत दरोडा पडत असल्याच्या हालचाली निर्देशनात आल्याने त्यांनी पोलिसांना फोन लावला. लागलीच वरणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जगदीश परदेशी, पी.एस.आय निलेश वाघ यांच्यासह पोलिस कर्मचार्‍यांनी वेळीच धाव घेतल्याने बाहेर असलेला संशयीत आरोपी विक्की किशोर चौधरी यांने पळ काढला. बँकेच्या आत नरेश धनगर लपून बसला होता. पोलीसांनी विजया बँकेचे सहाय्यक मॅनेजर व्यंकटेश हनुमत जोगण्णावार वय ३१ यांना फोन लावून बोलवून रात्रीच बँक उघडून लपून बसलेला नरेश धनगर यास पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी आरोपी नरेश यास तुझ्या सोबत कोण होते असे विचारले असता त्याने विक्की चौधरीचे नाव सांगीतले. पोलिसांनी दुसरा आरोपी विक्की चौधरी यास ताब्यात घेतले आहे . पोलिसांच्या व नागरीकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.
 
 
या प्रकरणी फिर्यादी बँकेचे सहाय्यक मॅनेजर व्यकटेश जोगण्णावार यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिस स्टेशनला भाग ५ गुरनं ४० / १८ भादवि कलम ४५७, ३८०, ५११, ३४ प्रमाणे आरोपी किशोर सुधाकर धनगर, विक्की किशोर चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जगदीश परदेशी, पीएसआय निलेश वाघ, पोहेकॉ नागेद्र तायडे, महेद्र सुरवाडे, मेहरबान तडवी, मझहर पठाण, गोपाळ पाटील आदी करीत आहे.
@@AUTHORINFO_V1@@