डोंबिवलीत ‘काळा दिवस’ साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |





डोंबिवली: २६ जून, १९७५ ला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली. या दिवसाला मंगळवारी ४३ वर्षे झाली. या निषेधार्थ राज्यमंत्री तथा डोंबिवलीचे आ. रवींद्र चव्हाण यांनी ’काळा दिवस’ साजरा केला. या निमित्ताने त्यांनी डोंबिवली शहरात राहणार्या आणि आणीबाणीत कारावास भोगलेल्या काही कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

 

इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावून मंगळवारी बरोबर ४३ वर्षं पूर्ण झाली. या दिवसात लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा निर्माण केली तसेच भारतीय राज्यघटनेला मुरड घालत लोकशाही चिरडली. या दिवसाच्या निषेधार्थ आजचा दिवस भाजपकडून देशभरात ’काळा दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे. याच धर्तीवर या दरम्यान मंगलाताई कुलकर्णी, डोंबिवली शहराचे पहिले नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, जेष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, बबन लोहकरे, प्रकाश भुरके या सर्व मान्यवरांच्या घरी जाऊन चाफ्याची फुलं देऊन या सर्वांशी संवाद साधत आशीर्वाद घेतले तर मधुकर भागवत यांना अभिवादन केले तसेच लोकशाही किती महत्त्वाची आहे, याबाबत यांच्याशी चर्चा केली. यावेळी या दिवसाच्या आठवणीही या ज्येष्ठांनी आ. चव्हाण यांना सांगितल्या.

@@AUTHORINFO_V1@@