नाशिक मनपातर्फे पाणीपुरवठा विभागाची कामे जोरात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |



 

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकणे व पाणीपुरवठ्याकरिता उंच पाण्याच्या टाक्या बांधणे व इतर प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील जलशुद्धीकरण केंद्र पाण्याच्या टाक्या व पाईपलाईनच्या कामात भेटी देऊन पाणीपुरवठा वितरणव्यवस्था सुधारण्यासाठी प्राधान्य देऊन मुख्यत्वे शुद्ध, पुरेसा व योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी व असलेल्या कामांना गती देऊन कामे मुदतीत व पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पाणीपुरवठा सुरळीत करण्याकरिता पाईपलाईन टाकण्याची कामे, काही टाक्यांची कामे मुदतीच्या आत पूर्ण करून पाणीपुरवठ्यात सुधारणा केली आहे. त्याची विभागनिहाय माहिती खालीलप्रमाणे आहे.

 

नाशिक पूर्व विभागातील ६.१७ किमी. लांबीची विविध वितरण वाहिन्यांची कामे पूर्ण झाले. नाशिक पश्चिम विभागातील ५.३२ किमी. लांबीची विविध वितरण वाहिन्यांची कामे पूर्ण झाल्यामुळे रचना विद्यालय परिसरात पाईपलाईन टाकल्याने कुलकर्णी गार्डन, रचना विद्यालय वितरण व्यवस्थेत सुधारणा होऊन परिसरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे. पंचवटी विभागातील २९.८८ किमी. लांबीची विविध वितरण वाहिन्यांची कामे पूर्ण झाले. नाशिकरोड विभागातील ४.९८ किमी. लांबीची विविध वितरण वाहिन्यांची कामे पूर्ण झाले आहे. सातपूर विभागातील ५.९६ किमी. लांबीची विविध वितरण वाहिन्यांची कामे पूर्ण झाले त्यामुळे व्यवस्थेत सुधारणा होऊन पाणीपुरवठा सुरळीत झालेला आहे.

 

नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम, उद्यान, विद्युत व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सुरू असलेल्या कामांची पाहणी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली. प्रलंबित कामांबाबत आढावा बैठकीत माहिती घेऊन संदर्भीय कामांना गती देण्याचे आदेश दिले. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ टक्के मागासवर्गीय राखीव निधीतून रस्ते खडीकरण, डांबरीकरण, अभ्यासिका, महिला व्यायामशाळा, मार्गदर्शन केंद्र उभारणी अशी विविध विकासात्मक ७ कामे १ कोटी २० लक्ष रुपयांची कामे पूर्ण केली असून विद्युत विभागाने शहरातील विविध भागांत एलईडी फिटिंग लावण्याची १ कोटी १२ लक्षची १२ कामे पूर्ण केली आहेत, तर ३१ ठिकाणी उद्यानांचे सुशोभीकरण करणे असे एकूण ४ कोटी ४० लक्षची कामे मुदतीपूर्वी पूर्ण झालेली आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहर विकासाच्या दृष्टीन विविध कामे हाती घेण्यात आली. त्यात ६ कोटी ७२ लाखांची कामे बांधकाम, उद्यान, विद्युत व पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांच्या तक्रारी कमी होऊन नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@