नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी उद्या मतमोजणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |

गठ्ठे तयार करण्यासाठी पाच तर मतमोजणीसाठी अनेक फेर्‍या
१६ उमेदवारांचा फैसला उद्यापासून स्पष्ट

 
क्लिष्ट मतमोजणी प्रक्रियेमुळे निकालासाठी २९ जूनपर्यंत लागणार वेळ
जळगाव, २६ जून :
राज्य विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी २५ रोजी मतदान झाले असून उद्या गुरुवारी २८ रोजी मतमोजणी होणार आहे. १६ उमेदवारांच्या भविष्याचा फैसला उद्यापासून स्पष्ट होणार आहे. ही मतमोजणी नाशिक येथे सकाळी सुरु होणार असून प्रक्रिया क्लिष्ट असल्याने निकाल हाती येण्यास २९ जून हा दिवसही उजाडू शकतो.
 
 
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी नाशिक, धुळे, नगर, नंदुरबार व जळगाव या पाच जिल्हयातील शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत १६ उमदेवार मैदानात हेाते. ९४ मतदान केंद्रावर पसंती क्रमानुसार मतदारांनी मतदान केले. उद्या २० टेबलांवर ही मतमोजणी केली जाणार आहे.
 
 
अशी होईल मतमोजणी
२० टेबलांवर पहिल्या फेरीत २५ किंवा ५० चे गठ्ठे तयार करण्यात येतील. २० टेबलांवर पहिल्या फेरीत नंदुरबारची १६ केंद्रे व धुळयातील ४ केंद्रे गठ्ठा तयार करण्यासाठी घेतली जातील. दुसर्‍या फेरीत धुळयाची ८ आणि जळगावची १२ केंद्रे, तिसर्‍या फेरीत जळगावची ९ आणि नगरची ११ केंद्रे, चौथ्या फेरीत नगरची ९ केंद्रे आणि नाशिकची ११ केंद्रे गठ्ठे, पाचव्या फेरीत पहिल्या १४ टेबलांवर नाशिकची १४ केंद्रे गठ्ठे तयार तयार करण्यासाठी घेतली जातील.
 
 
प्रत्यक्ष मतमोजणी अशी होणार
प्रत्येक टेबलावर २५ चे सुमारे १०६ किंवा ५० चे सुमारे ५३ गठ्ठे मोजले जातील. १६ उमेदवारांची मते, एक नोटा आणि एक अवैध मते अशा १८ आडव्या रकान्यांचा व २५ किंवा ५० उभ्या रकान्यांचा तक्ता प्रत्येक टेबलावर दिला जाणार आहे. सुमारे ५३ हजार मतपत्रिकांचा प्रथम पसंती क्रमांक निश्चित होऊन नोटा आणि बाद मतपत्रिका बाजूला ठेवल्या जातील. १६ उमेदवारांना मिळालेल्या प्रथम पसंतीच्या मतांची बेरीज ही वैध मते असतील. त्या मतांना दोनने भागून त्या भागाकारात एक मिळवून निवडून येण्याचा कोटा निश्चित केला जाईल.
 
 
अशा असतील मतमोजणी प्रक्रिया
पहिली फेरीतील १ ते १६ उमेदवारांची प्रथम पसंतीची मते निश्चित केल्यावर कोटा पार करणारा उमेदवार विजयी होऊ शकतो. परंतु १६ उमेदवार रिंगणात असल्याने असे होण्याची शक्यता अल्प आहे. पहिल्याच फेरीत उमेवार निर्धारीत कोटा गाठू न शकल्यास पुढील प्रक्रिया सुरु होईल. पहिल्या फेरीत सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार वगळला जाईल. त्या उमेदवाराच्या मतपत्रिका काढून घेऊन त्या मतपत्रिकेवरील दुसर्‍या पसंतीची मते ज्या ज्या १५ उमेदवारांना पडली असतील ती त्यांना दिली जातील आणि प्रगत(प्रोग्रेसिव्ह) बेरीज केली जाईल.
 
 
दुसरी फेरी - यात पहिल्या फेरीतील प्रगत मते विचारात घेऊन राहिलेल्या १५ उमेदवारात ज्याची सर्वात कमी मते असतील तो उमेदवार वगळून त्याची मते स्पर्धेत उरलेल्या १४ उमेदवारांमध्ये वाटली जातील. ही मते वाटतांना वगळण्यात आलेल्या दोन उमेदवारांना मिळालेले पसंती क्रमांक वगळून पुढील पसंती क्र. दुसरा व तिसरा स्पर्धेतील १४ उमेदवारांना वाटले जातील व १४ उमेदवारांची प्रगत मतांची बेरीज केली जाईल.
 
 
तिसरी फेरी - यात १४ उमेदवारांमध्ये सर्वात कमी मते असणारा उमेदवार वगळून त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेतील पुढील पसंती क्रम स्पर्धेत टिकलेल्या १३ उमेदवारांना वाटून त्या मतांची प्रगत बेरीज केली जाईल.
 
 
चौथी फेरी - यात १३ उमेदवारांमध्ये सर्वात कमी मते असणारा उमेदवार वगळून त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेतील पुढील पसंती क्रम स्पर्धेत टिकलेल्या १२ उमेदवारांना वाटून त्या मतांची प्रगत बेरीज केली जाईल.
 
 
पाचवी फेरी - यात १२ उमेदवारांमध्ये सर्वात कमी मते असणारा उमेदवार वगळून त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेतील पुढील पसंतीक्रम स्पर्धेत टिकलेल्या ११ उमेदवारांना वाटून त्या मतांची प्रगत बेरीज केली जाईल.
 
 
सहावी1 फेरी - यात ११ उमेदवारांमध्ये सर्वात कमी मते असणारा उमेदवार वगळून त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेतील पुढील पसंती क्रम स्पर्धेत टिकलेल्या १० उमेदवारांना वाटून त्या मतांची प्रगत बेरीज केली जाईल.
 
 
सातवी फेरी - यात १० उमेदवारांमध्ये सर्वात कमी मते असणारा उमेदवार वगळून त्या उमेदवाराच्या मतपत्रिकेतील पुढील पसंती क्रम स्पर्धेत टिकलेल्या ९ उमेदवारांना वाटून , त्या मतांची प्रगत बेरीज केली जाईल.
 
 
अशाप्रकारे जोपर्यंत ठरलेला कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मतमोजणी प्रक्रिया सतत चालू राहील. कोटा पूर्ण करणारा उमेदवार विजयी घोषीत करुन मतमोजणी प्रक्रिया थंाबविली जाईल. मात्र १५ फेर्‍या झाल्यानंतरही कोटा पूर्ण झाला नाही तरी स्पर्धेत जो शेवटचा उमेदवार टिकेल तो निवडून आल्याचे घोषित केले जाईल. त्याने कोटा पूर्ण केला नाही तरी तो विजयी होईल. रिंगणात १६ उमेदवार असल्याने आणि मतमोजणी प्रक्रिया क्लिष्ट असल्याने निकाल जाहिर होण्यास आणखी दोन दिवस लागून २९ जूनपर्यंत निकाल जाहीर केला जाऊ शकतो.
 
@@AUTHORINFO_V1@@