वीस हजार सेवेकऱ्यांचे गाणगापूरला ‘श्री गुरुचरित्र’ पारायण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |




नाशिक : भारतीय संस्कृती टिकविण्याची जबाबदारी सर्वच घटकांवर आहे. संस्कारक्षम पिढीसाठी लोकमान्य टिळक यांच्या गीता रहस्यग्रंथासह इतर आध्यात्मिक बाबींचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी अपेक्षा दिंडोरीप्रणीत स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय एकात्मता वाढावी, विश्वशांती आणि पर्जन्यराजाची कृपादृष्टी व्हावी या प्रमुख उद्देशाने एकदिवसीय श्री गुरुचरित्र पारायण करण्यात आले. पारायणासाठी देशातील विविध ठिकाणांहून सुमारे २० हजारांहून अधिक सेवेकऱ्यांनी हजेरी लावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र आणि इतर राज्य आणि देशांमध्ये सुरू असलेल्या स्वामी कार्याच्या नियोजनासंदर्भात अण्णासाहेब मोरे यांनी विविध समित्यांच्या सेवेकऱ्यांसमवेत प्रशासकीय बैठक घेतली.

 

शालेय जीवनात दिलेल्या संस्कारांची शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडते. त्यासाठी भारतीय संस्कृतीविषयी, आध्यात्मिक ग्रंथांचा काही भाग, संतांच्या कार्यासह इतर आध्यात्मिक बाबींचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी अक्कलकोट येथे श्री स्वामी समथर्र् महाराजांनी केलेल्या विविध लीला आणि आध्यात्मिक कार्याविषयी अण्णासाहेब मोरेंनी विविध दाखले देत मार्गदर्शन केले. सकाळी ८ च्या आरतीनंतर श्री गुरुचरित्रग्रंथ पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला. दुपारी १२ वाजता श्री स्वामी समर्थ गुरूपीठाचे व्यवस्थापक चंद्रकांत मोरे यांनी सेवेकऱ्यांशी हितगुज साधले. त्यानंतर दुसऱ्या सत्रात पारायणास प्रारंभ झाला. दुपारी २ वाजता श्री विष्णु सहस्त्रनामाने पारायण सोहळ्याची सांगता झाली. यावेळी सेवेकर्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

 

रासायनिक खतांमुळे होतो कर्करोग

 

शेतीमध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय खताचा उपयोग करण्याचे आवाहन अण्णासाहेब मोरे यांनी केले. कर्करोगमुक्तीसाठी सप्तरंगी वनस्पती काढा, रानभेंडीसह नारळाची शेंडी जाळून मधातून महिलांना दिल्यास गर्भाशयाचे आजार दूर होतात. कर्करोगासह शरीरातील कोणत्याही प्रकारच्या गाठी आणि इतर आजारांवरील आयुर्वेदिक औषधांविषयीदेखील यावेळी अण्णासाहेब मोरे यांनी मार्गदर्शन केले.

 

गाणगापूरच्या ११ शाळांमध्ये बालसंस्कार वर्ग सुरू

 

कर्नाटक राज्यातील गाणगापूर परिसरातील ११ शाळांमध्ये श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे बालसंस्कार वर्ग सुरू करण्यात आले. बालसंस्कार वर्गाची ग्रंथसंपदा मराठी, हिंदीसह इतर भाषांत उपलब्ध करून देण्यात आली. या ग्रंथसंपदेचे विद्यार्थ्यांना वाटप करून बालसंस्कार वर्गाच्या टीमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

चार वेदांचा अर्थ श्री गुरुचरित्र या ग्रंथात आहे. त्यामुळे या ग्रंथाचे पठण, पारायण सर्वांसाठी फलदायी आहे, परंतु या ग्रंथाचे महिलांनी पठण करू नये, असा चुकीचा संदेश मधल्या काळात देण्यात आला. त्यामुळे अनेक प्रकारच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल, अशा वावड्याही उठविण्यात आल्या. त्यामुळे अनेक प्रकारचे गैरसमजदेखील निर्माण झाले होते, परंतु हे सर्व गैरसमज पारायण सोहळ्यास महिलांच्या लक्षणीय अशा उपस्थितीने दूर झाले आहेत.

चंद्रकांतदादा मोरे

व्यवस्थापक श्री स्वामी समर्थ गुरूपीठ,त्र्यंबकेश्वर

@@AUTHORINFO_V1@@