मोकळया हवेत ‘मद्यपान’करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jun-2018
Total Views |

भुसावळला व्यापारी संकुलात रोजचे उद्योग

 
 
भुसावळ :
भुसावळ शहरात मोकळया हवेत मद्यप्राशान करावयाचे असल्यास भुसावळ नगर पालिकेच्या रुग्णालयाच्या शेजारील व्यापार संकुलात सर्व व्यवस्था उपलब्ध असल्याने तळीरामांना आनंद घेता येत आहे परंतु नागरिक आणि गाळेधारक मात्र प्रचंड त्रस्त झाले आहेत.
 
 
पालिकेच्या रुग्णालयास लागून पालिकेचे व्यापारी संकुल आहे. अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर हे व्यापारी संकुल असून हाकेच्या अंतरावर शहर पोलीस ठाणे आणि न्यायालय आहे.वर्दळीच्या ठिकाणी असले तरी मोकळी हवा येथे सतत उपलब्ध आहे. याचा लाभ तळीराम घेत असतात. हे व्यापारी संकुल म्हणजे मद्यपींसाठी खुला बारच आहे. राज्यात प्लास्टिक ग्लासवर बंदी असली तरी दारुडयांना येथे दारु पिण्यासाठी हे ग्लास उपलब्ध होत असतात. राज्यात गुटखा बंदी असतांना मद्यपी येथे गुटखा सेवन करतांना दिसतात. मद्यपी केवळ मद्यप्राशन करत नाहीत, तर येथे असलेल्या एकमेव जिन्यावर बाटल्या फोडतात. काही तळीराम येथेच निद्रा घेत असतात. निद्रेतच लघुशंका केलेले मद्यपी येथे नियमित बघायला मिळतात. दारु पिणार्‍यांच्या त्रासामुळे महिला ग्राहक संकुलात फिरकत नाही. दुकानदारांनासुध्दा यांचा त्रास होत आहे. नजीकच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भुसावळ विभागीय कार्यालय आहे. पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग कोणतीही कारवाई करतांना दिसत नाही. प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई न केल्यास येथे असलेल्या गाळेधारकांना गाळे सोडून इतरत्र व्यवसाय थाटण्याची वेळ येवू शकते.
 
@@AUTHORINFO_V1@@