बुलढाण्यातील दुर्दैवी कुटुंबाला सरकारची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |

शासनाने कुटुंबियांना दिले एकूण ८ लाख रुपयांचे चेक


 
बुलढाणा : खामगांव मतदार संघातील मौजे माटरगांव बुद्रुक, तालुका शेगांव येथे २१ जून रोजी विज पडून सैय्यद इलीयास सै सिकंदर हे शेतकरी व त्यांची मुलगी रुख्साना सै इलीयास या दोघांचा वीज कोसळून दुदैवी मृत्यू झाला होता. तसेच त्यांची लहान मुलगी तबस्सुम ही जखमी झाली होती. त्यामुळे या कुटुंबाला राज्य शासनामार्फत एकूण ८ लाख रुपयांचे चेक देऊन मदत करण्यात आली आहे.
 
या दुर्दैवी घटनेमुळे सैय्यद इलियास यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. राज्य शासनाने घटनेची माहिती घेऊन, तहसीलदार यांना तात्काळ मदत देणेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे त्यांनी काल त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शोकाकुल कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच राज्य शासनाच्या नवीन नियमानुसार इलियास यांच्या कुटुंबियांना मृत्यू पावलेल्या सैय्यद इलियास व रुखसाना सै इलियास यांच्या मृत्यू पश्चात प्रत्येकी ४-४ लाख असे एकूण ८ लाख रुपयांचे चेक वितरित केले.
 
 
“वडिलांच्या जाण्याचे दुःख हे भयंकर दुःख आहे. त्यातून सावरणे कठीण आहे. या परिस्थितीतून मी देखील गेलो आहे. इलियास यांची मुलं तर खूपच लहान आहेत. घरात्तील कर्ता गेल्यामुळे ह्या कुटुंबाचे छत्र हरविले. परंतु राज्यातील भाजपा सरकार आपल्या पाठीशी आहे. आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहे. राज्य सरकार कडून ८ लाख रुपये मदत करण्यात आली आहे. पैसा सर्व काही नाही. गेलेल्या व्यक्तीची उणीव पैशांनी भरून निघू शकत नाही. परंतु या दुःखाच्या क्षणात इलियास यांच्या कुटुंबीयावर जी आपत्ती कोसळली आहे त्यामुळे किमान त्यांच्या कुटुंबियांना भविष्यातील अडचणींना तोंड देता येईल.” अशा शब्दात आपल्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
 
यावेळी शेगांव तहसीलदार भागवत, नायब तहसीलदार मुकुंद, यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांची उपस्थिती होती.
 
@@AUTHORINFO_V1@@