जळगाव महानगर पालिकेचा बिगुल वाजला १ ऑगस्ट रोजी मतदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |
 
 

जळगाव महानगर पालिकेचा बिगुल वाजला 
 १ ऑगस्ट रोजी मतदान 

जळगाव, 25 जून
जळगाव महानगर पालिकेच्या निवडणुकिचा बिगुल वाजला असून 1 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. 75 उमेदवारांचे भवितव्य 1 ऑगस्टरोजी मतपेटीत बंद होईल व 3 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.
 
 
जळगाव महानगर पालिकेच्या 75 जागांसाठी ही निवडणुक होत असून  19 प्रभागात  75 जागा असणार आहेत. यातील 18 प्रभागांमध्ये प्रत्येकी 4 जागा तर शेवटच्या प्रभागात 3 जागा असणार आहेत. आरक्षण सोडत पाहता 38 जागांवर महिला राज असणार आहे. निवडणुकिसाठी मतदान 1 ऑगस्ट ला तर मतमोजणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे.
 
 
मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकिचा बिगुल वाजला असाला तरी प्रमुख राजकिय पक्षांना ही निवडणुक कोणाच्या नेतृत्वात लढवायची  हे अद्याप ठरविता आले नाही  त्यामुळे नेतृत्वाचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे . या प्रश्नाच्या उत्तरावरच अनेक उमेदवारांचे भवितव्य असलंबुन  आहे. कोणाच्या नेतृत्वात निवडणुक लढविली जाणार यावरुन काहींना उमेदवारी मिळणार आहे तर अनेकांची उमेदवारी कापली जावू शकते. स्थानिक आघाडया आणि प्रमुख राजकियपक्ष यांच्यातील पेच कायम आहे. आतातरी निवडणुकिचे नेतृत्व ठरेल अशी चर्चा राजकियपक्षांच्या कार्यकर्त्यानमध्ये आहे .
 
@@AUTHORINFO_V1@@