हेडगेवारांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबीर संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |


 
 

 

 
डोंबिवली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डोंबिवलीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांत; डोंबिवली-कल्याण जिल्हा आणि वामनराव ओक रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबीर रविवारी संपन्न झाले.
 
 

दरवर्षी या संस्थेच्या वतीने हेडगेवारांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदा या शिबिराचे १५ वे वर्ष आहे. या कार्यक्रमाचे आयोजन दि. १७ जून रोजी एमआयडीसी रिजन्सीपरिसरात करण्यात आले, तर दि.२४ मे रोजी सकाळी ९ .३० ते दुपारी २ या वेळेत पूर्वेतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, पंडित राणाप्रताप भवन व पश्चिमेतील राणाप्रताप शाळेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात याचे आयोजन करण्यात आले होते.

 
 

पूर्वेतील राणाप्रताप भवन येथे झालेल्या उपक्रमात ४८ नागरिकांनी तर पश्चिमेतील शिबिरात ६३ नागरिकांनी रक्तदान केले. संकलित रक्ताच्या बाटल्या या ठाणे येथील वामनराव ओक रक्तपेढीत जमा करण्यात आल्या असून येत्या काळात डोंबिवलीतही वामनराव ओक रक्तपेढी निर्माण करण्याचा मानस असल्याची माहिती जनकल्याण समिती जिल्हा कार्यवाह निलेश काळे यांनी दिली.

 
 

यावेळी वामनराव रक्तपेढीचे डॉ. खरीवान, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार गोटे, जनकल्याण समितीच्या कल्याण जिल्हा उपाध्यक्षा शुभदा देशमुख, जिल्हा कार्यवाह निलेश काळे तर प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका वृशाली जोशी, नगरसेवक राजन सामंत, रक्तपेढी जनसंपर्क अधिकारी सुरेंद्र बेळवळकर, शिकवणी वर्गाचे ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत बाऊसकर, वासुदेव जांभळे व रा. स्व. संघाचे व जनकल्याण समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
 
@@AUTHORINFO_V1@@