जिद्द असावी तर ‘गोल्डन गर्ल’सारखी...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



 
 

शाळेतील धावण्याची स्पर्धा तर उषाने सहज जिंकली, परंतु त्यामध्ये एक विक्रम प्रस्थापित झाला, याची कोणालाच कल्पना नव्हती आणि कोणी तशी अपेक्षाही केली नव्हती. आपण अजाणतेपणी राष्ट्रीय विक्रम मोडला याची उषाला जराही कल्पना आली नाही. अवघ्या १३ व्या वर्षीच उषाने राष्ट्रीय विक्रम मोडला. त्यावेळी उषामध्ये किती जोश असेल, किती उत्साह असेल याची कल्पना करताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.

मुळातच प्रतिभावंत असलेल्यांना कोणत्याही सोयीसुविधांची गरज नसते. मार्गात येणारा प्रत्येक अडथळा सहजपणे पार करत ते आपले निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. प्रतिभावंत व्यक्ती सूर्यासारखी असते, जी आपल्या प्रकाशाने इतरांच्या जीवनात झगमगाट आणत असते. भारताची शान असलेलीउडन परी’, ‘गोल्डन गर्लपी. टी. उषा हे त्यापैकीच एक नाव. पिलाव्हुल्लकंडी ठेक्करा पारांबिल उषा म्हणजेच पी. टी. उषा हे नाव ऐकल्याबरोबर प्रत्येक भारतीयाची मान गर्व आणि अभिमानाने उंचावते. पी. टी. उषाने आंतरराष्ट्रीय पदकांचं शतक साजरं केलं असून, आशियातील सर्वोत्तम महिला ऍथलिट, अशी उषाची ओळख आहे.

२७ जून १९६४ रोजी केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील पय्योली येथे जन्म झालेल्या पी. टी. उषालाही आपल्यात असलेल्या प्रतिभेची जाणीव नव्हती. आपण जगातील सर्वांत वेगवान धावक बनू शकतो, याची उषाला कल्पना नव्हती आणि घरची परिस्थिती लक्षात घेता तसा विचार करण्याचं कारणही नव्हतं. उषाचं बालपण खूपच गरिबीत गेलं. खेळणं आणि धावण्याचा विचार तर दूरच, कुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालू शकेल, एवढंही तिच्या कुटुंबाचं उत्पन्न नव्हतं. उषाचा जन्म पय्योली गावात झाला म्हणून लोक तिलापय्योली एक्सप्रेसया नावानेही ओळखतात.

उषाला बालपणापासूनच थोडं वेगात चालण्याची सवय होती. मग गावातील एखादं दुकान असो की शाळा, उषा झटकन तिथे पोहोचत असे. उषा अवघ्या १२-१३ वर्षांची असताना तिच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता. त्यामध्ये धावण्याची एक स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. तू इकडेतिकडे धावत असतेस, तर शाळेतील स्पर्धेत का भाग घेत नाहीस? असं सांगून उषाच्या मामाने तिला यामध्ये भाग घ्यायला सांगितलं. मामापासून प्रेरणा घेत उषाने धावण्याच्या या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत भाग घेतलेल्या १३ मुलींपैकी उषा सर्वात लहान होती, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. स्पर्धा सुरू होताच उषा इतक्या वेगात धावली की, बाकी मुली तिच्याकडं बघतच राहिल्या. पी. टी. उषाने काही सेकंदातच ही स्पर्धा जिंकली आणि उषाचा आशियातील सर्वोत्तम ऍथलिट होण्याचा प्रारंभ तिथूनच झाला. उषाच्या चमकत्या कारकिर्दीतील तो पहिला टप्पा होता. त्यानंतर उषाला २५० रुपये मासिक शिष्यवृत्ती मिळू लागली आणि तेवढ्यात ती आपलं काम भागवत असे.

शाळेतील धावण्याची स्पर्धा तर उषाने सहज जिंकली, परंतु त्यामध्ये एक विक्रम प्रस्थापित झाला, याची कोणालाच कल्पना नव्हती आणि कोणी तशी अपेक्षाही केली नव्हती. आपण अजाणतेपणी राष्ट्रीय विक्रम मोडला, याची उषाला जराही कल्पना आली नाही. अवघ्या १३ व्या वर्षीच उषाने राष्ट्रीय विक्रम मोडला, त्यावेळी उषामध्ये किती जोश असेल, किती उत्साह असेल याची कल्पना करताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.

१९९७ साली पी. टी. उषाने राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत भाग घेतला. अनेक नामवंत या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होते. त्या स्पर्धेत पी. टी. उषाने आपली सर्वोत्तम कामगिरी केली. याच ठिकाणी प्रशिक्षक . एम. नाम्बियार यांनी उषामधील प्रतिभेची पारख केली. ही मुलगी देशाचा मानसन्मान आणि गौरव वाढवू शकते, याची खात्री त्यांना पटली. त्यानंतर नाम्बियार यांनी उषाला प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला. सातत्याने तिच्यावर मेहनत घेतल्यानंतर पी. टी. उषा ऑलिम्पिकमध्ये धावण्यास सज्ज झाली. अनेकांना यशोशिखरावर जाण्यासाठी खूप वेळ लागतो किंवा त्यासाठी बराच काळ संघर्षही करावा लागतो, परंतु ग्रामीण पृष्ठभूमी असलेली सडपातळ बांध्याची पी. टी. उषा थांबण्याचं नावच घेत नव्हती. वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्यास उषा सज्ज झाली.

उषाने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला, परंतु पहिल्या प्रयत्नात तिला अपेक्षित यश मिळालं नाही. मात्र, या अपयशाने उषा किंवा प्रशिक्षक नाम्बियार खचून गेले नाहीत. उषामधील प्रतिभा आणखी निखारण्याचं काम नाम्बियार यांनी हाती घेतलं. उषाने त्यानंतरच्या ऑलिम्पिकमध्ये आणखी जोशात सहभाग घेतला आणि आपल्या कामगिरीने उषाने देशाचा नावलौकिक जगभरात पसरवला. आपल्या चमत्कारी प्रदर्शनाने उषाने १०० आणि २०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर उषाने अनेकदा सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. सडपातळ बांध्याची भारताची पी. टी. उषा ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरीची लढत जिंकून अंतिम फेरीत पोचू शकते, यावर बहुतांश लोकांचा विश्वासच नव्हता. १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्येही तिने चौथे स्थान प्राप्त केले होते. हा गौरव प्राप्त करणारी उषा एकमेव महिला धावक आहे.

त्यानंतर उषाने मागे वळून बघितलंच नाही आणि एकामागोमाग एक सर्वोत्तम कामगिरीचं सत्र सुरूच ठेवलं. जकार्ता येथील आशियाड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्यापेक्षा सरस कोणीच नाही, हे उषाने दाखवून दिलं. ट्रॅक ऍण्ड फिल्ड स्पर्धांमध्ये उषाने सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून आशियातील सर्वोत्तम धाविका, हा बहुमान प्राप् केला. कुवैत येथील आशियाई ट्रॅक ऍण्ड फिल्ड स्पर्धेत उषाने नव्या आशियाई विक्रमासह ४०० मीटर्सचं सुवर्णपदक जिंकून जगाला आश्चर्याचा धक्का दिला. तिच्या या कामगिरीमुळे क्रीडा समीक्षक आणि उपस्थितही अवाक् झाले होते.

पी. टी. उषाने आपल्या जीवनात जे काही साध्य केलं त्याचं वर्णन करायला अनेक पानं अपुरी पडतील. आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत उषाने अनेकदा देशवासीयांना मान अभिमानाने उंचावण्याची संधी दिली. उषाने आतापर्यंत १०१ आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल १९८५ साली उषाला पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पी. टी. उषाचा जीवनप्रवास खरोखरच एक आदर्श असून, अनेकांना प्रेरणा देणारा आहे. उषाने आपली कारकीर्द झाल्यावर थांबता आपल्यासारख्या अनेक उषा घडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यात तिला यश मिळो, हीच शुभेच्छा!

 
 

माण एक्स्प्रेस

आपल्या महाराष्ट्रातील धावपटू ललिता बाबर हिनेसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहे. तिच्या देदीप्यमान कामगिरीवर खुश होऊन महाराष्ट्र सरकारने तिला थेट अधिकारी पदावर नियुक्ती दिली आहे. त्याचवेळी तिला क्रीडा क्षेत्रातील अतिशय सन्मानाचा अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत ट्रॅक फायनलमध्ये पोहोचणारी ललिता बाबर ही पी. टी. उषानंतर दुसरी भारतीय महिला धावपटू ठरली आहे. ललिता बाबरचा प्रवासही थक् करणारा आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण या तालुक्यात असलेल्या मोही या छोट्याशा गावात वाढलेली ललिता घरची अतिशय गरीब होती. पण, जिद्द, परिश्रम करण्याची तयारी, समर्पण भाव, अतुलनीय आत्मविश्वास या गुणांच्या बळावर तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आणि आपल्या नावाचा झेंडा रोवला. तिच्या धावण्याच्या गतीमुळे तिलामाण एक्स्प्रेसम्हणूनही ओळखले जाते. आता २०२० साली टोकियो येथे होणार्‍या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे लक्ष्य ठेवून तिने तयारी सुरू ठेवली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये ललिता दहावी आली होती.

 

सावरपाडा एक्सप्रेस

भारताची आंतरराष्ट्रीय धावपटूसावरपाडा एक्सप्रेसकविता राऊतची खडतर वाटचाल तर आता धड्याच्या स्वरूपात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात असणार आहे. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘यशवार्ताया मासिकाचे कार्यकारी संपादक संतोष साबळे लिखित कविता राऊतवरील धड्याचा समावेश बालभारतीच्या नवीन अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने या पाठाचा समावेश अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणार्‍या कविताच्या संघर्षमय प्रवासावरील हा धडा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असल्याने त्याचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे.

कविताने मुक्त विद्यापीठातूनच शिक्षण घेतले आहे. मराठी भाषा समितीचे ज्येष्ठ सदस्य इरगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या पुस्तकात यदुनाथ थत्ते, डॉ. अनिल गोडबोले, डॉ. सरोजिनी बाबर, . मा. मिरासदार, कवयित्री बहिणाबाई चौधरी या मान्यवरांचे धडे आणि कवितांचाही समावेश आहे.

सावरपाड्याचे नाव देशभर झाले असले तरी माझ्या जीवनप्रवासावरील धड्याचा बालभारतीने अभ्यासक्रमात समावेश केल्याने खूप आनंद झाला. राज्यातील मुलींनी शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राकडे वळायला हवे, असे वाटते. यासाठी मुक्त विद्यापीठ उत्तम पर्याय आहे, असे जे मत कविता राऊत हिने व्यक् केले आहे, ते योग्यच म्हटले पाहिजे.

 

डॉ. वाय. मोहितकुमार राव 

@@AUTHORINFO_V1@@