राजकिय पक्षांच्या बुथवर प्लास्टिक बंदीच्या नियमाची पायमल्ली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |
 
 
जळगाव, २५ जून :
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी २५ रोजी मतदान झाले पण राजकिय पक्षाच्या बुथवर प्लास्टिकचे ग्लासचा उघडपणे वापर झाला. नियमाची पायमल्ली झाली.
 
 
राज्य शासनाने गेल्या आठवडयात राज्यात प्लास्टिक बंदीचा नियम लागू करुन त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. राज्यात काही जिल्ह्यात या नियमाचे उल्लंघन करणार्‍यांविरुध्द कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पण सोमवार रोजी शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाच्यावेळी एका राजकीय पक्षाच्या बुथमध्ये कार्यकर्त्यांसाठी पिण्याचे पाणी जारव्दारे उपलब्ध करण्यात आले. पण पाणी पिण्यासाठी प्लास्टिकचे ग्लास देण्यात आले. प्लास्टिकबंदी असतांना अशाप्रकारे राजकीय पक्षांकडूनच शासनाच्या नियमांची पायमल्ली होणार असेल तर हा नियम पाळला जाईल का ? असा प्रश्न मतदारांना पडला होता.
 
 
बुथवर ठळकपणे प्लास्टिकचे ग्लास दिसत असतांनासुध्दा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने नियम आणि कायदा फक्त सामान्यजनासाठीच आहे का ? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@