मुस्लिम नागरिक राजकीय सत्तेत आले तरच धर्मनिरपेक्षता अबाधित राहिल : ओवैसी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |

 
मुंबई :  "धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीला जीवंत ठेवाचे असेल तर मुस्लिम नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी लढणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी सत्तेत येणे गरजेचे आहे. त्यामुळे मी मुस्लिम नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करावा आणि मुस्लिम उमेदवारांनाच मत द्यावे." असे वादग्रस्त विधान एमआयएमचे अध्यक्ष असासुद्दीन ओवैसी यांनी केले. एका कार्यक्रमाला संबोधित करताना काल ते बोलत होते.
 
"धर्मनिरपेक्षेतेविषयी बोलताना केवळ मुस्लिम धर्मीय उमेदवारांनाच मत द्या असे आवाहन करणे कितपत योग्य आहे?" असा सवाल समाज माध्यमांवर अनेक नागरिकांनी उपस्थित केला. याआधी देखील ओवैसी यांनी असे अनेक वादग्रस्त विधाने केली होती, ज्यानंतर अनेक वाद निर्माण झाले आहेत.
 
गंगा यमुनाच्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. त्यामुळे आता जागे व्हा, उठा आणि आपल्या हक्कांसाठी लढा, अशा शब्दात ओवैसी यांनी मुस्लिम तरुणांना आवाहन केले आहे. हे आवाहन हक्कांसाठी आहे का धर्माविषयी मनात विष कालवण्यासाठी ? असा प्रश्न समाज माध्यमांवरुन उपस्थित केला जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@