वडाळ्यातील ‘दोस्ती पार्क’जवळरस्ता खचला, गाड्यांचे नुकसान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |





मुंबई: मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असतानाच वडाळ्यातील अ‍ॅण्टॉप हिल परिसरात दोस्ती पार्कइमारतीजवळील रस्ता खचल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. रस्ता खचल्याने इमारतीची संरक्षक भिंतदेखील कोसळली असून या घटनेत सुमारे १५ वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच,रस्त्याचे करण्यात आलेले काम व त्याच्या दर्जाबाबत सर्वसामान्य नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

 
 

मुंबईत रविवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अ‍ॅण्टॉप हिल परिसरात असलेल्या लॉईड्स इस्टेटच्या कंपाऊंडजवळ असलेला मोठा भाग भूस्लखनामुळे सोमवारी सकाळी कोसळला. त्यात जवळपास १५ गाड्या दबल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या बांधकामाविषयी स्थानिकांनी पालिकेकडे यापूर्वी अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे ही दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दोस्ती एकर्सला बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात बीएमसी अधिकार्‍यांनी पाठीशी घातल्याने हा प्रकार घडल्याचा आरोपदेखील स्थानिकांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी विकासक दीपक गरोडिया, किसन गरोडिया राजेश शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून खोदकाम करताना दोस्ती बिल्डरने व्हायब्रेटरच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

@@AUTHORINFO_V1@@