नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीला गालबोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Jun-2018
Total Views |

राष्ट्रवादीकॉंग्रेस व सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

 
 
 
जळगाव, २५ जून :
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी २५ रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरु झाले. परंतु, नाशिक येथे हाणामारी झाल्याने मतदानास गालबोट लागले.
 
 
सोमवार रोजी सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरु झाले असून ११ वाजेपर्यंत नाशिक - २१.७४, जळगाव - २१.११, धुळे - ३२.३४, नगर - १६.५३ व नंदुरबार - २६.०३ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीसाठी ५५ हजार मतदार आहे.
 
 
नाशिक येथे शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी निवडणूकीतून माघार घेतली असल्याचा संदेश सोशल मीडियावर पसरला. हा संदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराने पसरवला असल्याच्या संशयाने वातावरण चिघळले. भालेकर विद्यालयातील मतदान केंद्रावर राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादंग होवून हाणामारी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. बेडसे आणि दराडे यांच्या काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
 
दरम्यान, जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांनी जळगाव येथील मतदान केंद्राजवळ कार्यकर्त्यांना भेट देवून चर्चा केली. यावेळी जळगाव शहराचे आ.सुरेश भोळे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@